श्रीनगरमध्ये सामाजिक कार्यकर्तीचा टीव्ही शो दरम्यान मृत्यू

श्रीनगर (जम्मू-काश्‍मीर) – जम्मू-काश्‍मीरमधील एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ती आणि डोग्रा स्कॉलर रिता जतींदर यांचा एका टीव्ही शो दरम्यान मृत्यू झाला आहे. दूरदर्शनच्या श्रीनगर केंद्रावरील एका कार्यक्रमाच्या वेळी हृदयक्रिया बंद पडून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

रिता जतींदर यांच्या कार्यक्रमाचे दूरदर्शन श्रीनगरवर “लाईव्ह’ प्रक्षेपण चालू होते. मुलाखतकाराशी बोलत असतानाच त्या अचानकपणे खुर्चीवरून मागे कोसळल्या. नंतर प्रक्षेपण थांबवून त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

रिता जतींदर या जम्मू-काश्‍मीर कला, संस्कृती आणि भाषा अकादमीच्या सचिव होत्या. त्यांच्या धक्कादायक निधनाबद्दल समाजातील सर्व थरांतून ट्विटर व फेसबुकवर शोक व्यक्त करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)