श्रीनगरमध्ये चकमकीत एक जवान शहीद 

श्रीनगर: जम्मू-काश्‍मिरच्या बटमालूमध्ये सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत एक जवान शहीद, तर तीन जवान जखमी झाले आहेत. बटमालू परिसरात दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर सुरक्षा यंत्रणेने ही कारवाई केली होती. जम्मू-काश्‍मिरचे डीजीपी एसपी वैद यांनी ट्‌विटरवर माहिती दिली की, दहशतवाद्यांबाबत माहिती मिळाल्यानंतर बटमालू येथे शोध मोहीम सुरू करण्यात आली. भारतीय जवान घटनास्थळी पोहोचताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला.
याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात स्पेशल ऑपरेशन ग्रुपचा एक जवान शहीद झाला आहे. तसेच या चकमकीत जम्मू काश्‍मिर पोलिसांचा एक जवान आणि सीआरपीएफचे दोन जवान जखमी झाल्याची माहितीही वैद यांनी दिली. शहीद जवान एसओजी एसपीच्या पीएसओची जबाबदार सांभाळत होता. पहाटे चार वाजल्यापासून ही चकमक सुरू झाली. सुरक्षा यंत्रणेने एका दहशवाद्याला घेरले असल्याची माहिती समोर येत आहे. या परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)