श्रीनगरमधील उद्याने – काश्‍मीरची शान

सुप्रसाद पुराणिक

श्रीनगरमधील उद्याने ही जम्मू काश्‍मीरची शान आहेत. भारतावर अनेक वर्षे राज्य केलेल्या मुघल सम्राटांना येथील सृष्टिसौंदर्याची भुरळ पडली व त्यांनी येथे भव्य उद्याने विकसित केली. साधारण मार्च ते ऑक्‍टोबर दरम्यान येथील उद्याने सशुल्क बघता येतात.

इंदिरा गांधी ट्युलिप गार्डन – दल सरोवराच्या जवळील आशिया खंडातील सर्वात मोठे हे ट्युलिप गार्डन श्रीनगरपासून 10 कि.मी. वर आहे . मफ देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए या अमिताभ आणि रेखा यांच्या सिलसिला चित्रपटातील या गाण्याचे शूटिंग या बागेत झाले होते. ट्यूलिपबरोबर येथे इतरही फुले फुललेली दिसतात. इंदिरा गांधी यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या या बागेत वसंत ऋतुत लाखो फुले फुलतात व तो नयनरम्य सोहळा बघायला लोक इथे भेट देतात. या उद्यानाशेजारी एक बोटॅनिकल गार्डन आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शालिमार बाग – श्रीनगरपासून 15 कि.मी. वर असलेली ही बाग मुघल गार्डन म्हणून ओळखली जाते. जहांगीर बादशहाने 1619 मध्ये नूरजहॉं हिच्यासाठी बाग निर्माण केली असे सांगितले जाते. तरी ज्याने श्रीनगर शहर वसविले त्या प्रवरसेन (द्वितीय) राजाने येथे उद्यानगृह म्हणजेच बागेतले निवासस्थान उभारले होते व त्याचे नाव शालामार ठेवले होते असेही सांगितले जाते. येथील रंगीबेरंगी फुले, डेरेदार वृक्ष, मनमोहक कारंजी मन प्रसन्न करून टाकतात. मुघल बागाइतकामातील शास्त्र व कला याचे ही बाग उत्तम उदाहरण आहे.

चश्‍मेशाही बाग – चश्‍मेशाहीचा इंग्रजीत अनुवाद मफद रॉयल स्प्रिंगफफ तर मराठीत व हिंदीत अर्थ मफशाही बागफफ. श्रीनगरपासून 11 कि.मी. वर असलेले हे मुघल उद्यान 1642 रोजी शहाजहानने आपला मोठा मुलगा दारा शिकोह याच्यासाठी बांधली या उद्यानाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील झऱ्याचे थंडगार मधुर पाणी . रूपा भवानी या संत महिलेने हा झरा शोधून काढला. पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्याकाळी पिण्यासाठी पाणी येथून दिल्लीला नेले जात असे, असेही कळते.

निशात बाग – दल सरोवराच्या किनाऱ्यावरील ही मोठी बाग श्रीनगरहून 13 कि.मी. वर आहे . 1633 मध्ये नूरजहॉंनचा भाऊ असिफ खान याने या बागेची निर्मिती केली होती . या बागेला पाठीमागे पीर पंजाल डोंगररांगांनी पार्श्वभूमी लाभलेली आहे . इतर बागांप्रमाणे इथेही पाण्याचा प्रवाह खाली उतरत येतो. त्याच्या दुतर्फा असलेली सुकुमार फुलांचे ताटवे , हिरवळीची मैदाने , चिनार वृक्ष बागेच्या श्रीमंतीत भर टाकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)