श्रीदेवी यांना मरणोत्तर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बोनी कपूर यांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना मरणोत्तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असून,  ‘मॉम’ या चित्रपटासाठी श्रीदेवी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर त्यांचे पती बोनी कपूर  यांनी ट्विट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. बोनी कपूर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की,  “ज्युरींनी ‘मॉम’साठी श्रीदेवींना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर केल्याची बातमी कळताच  आनंदाला पारावार उरला नाही. हा आमच्यासाठी अतिशय खास क्षण आहे.”

पुढे त्यांनी म्हंटले आहे की, श्रीदेवी परफेक्शनिस्ट होत्या आणि त्यांच्या 300 चित्रपटांमध्ये ते दिसते. त्या फक्त सुपरअॅक्ट्रेसच नव्हे तर सुपरवाइफ आणि सुपरमॉम होत्या. त्यांच्या आयुष्यातील ही अचिव्हमेंट साजरी करण्याची ही वेळ आहे. आज त्या आमच्यात नाहीत. पण त्यांचा हा वारसा कायम आमच्यासोबत राहिल.” “आम्ही भारत सरकार आणि सन्माननीय ज्युरी मेंबर्सचे आभार व्यक्त करतो. आम्ही श्रीदेवींजींच्या सर्व फ्रेंड्स आणि फॅन्सचे आभार व्यक्त करतो, जे आम्हाला शुभेच्छा पाठवत आहेत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)