श्रीदेवी पुन्हा एकदा येणार चाहत्यांच्या भेटीला 

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. श्रीदेवी आता पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावरून आपल्या चाहत्यांना भेटण्यास येणार आहे. निर्माते आनंद एल. रॉय यांचा आगामी चित्रपट ‘झिरो’मध्ये श्रीदेवी झळकणार आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि कतरीना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

झिरो चित्रपटात श्रीदेवींनी काजोल, करिष्मा कपूर, राणी मुखर्जी, आलिया भट्टसह एका विशेष गाण्यावर परफॉर्मन्स केला आहे. त्यामुळे श्रीदेवींना पुन्हा एकदा पाहण्याची संधी मिळणार आहे. यामुळे हा चित्रपट चाहत्यांसाठी खूपच खास असणार यात शंका नाही. परंतु, शाहरुखने या गाण्याला सरप्राईज ठेवले आहे. दरम्यान, २१ डिसेंबर रोजी झिरो चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

-Ads-


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
2 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
2 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)