“श्रीदेवी एक्‍सलन्स ऍवॉर्ड’ प्रियांका चोप्राला

झारखंड फिल्म फेस्टिव्हलचा समारोप रविवारी झाला. त्यामध्ये प्रियांका चोप्राला “श्रीदेवी एक्‍सलन्स ऍवॉर्ड’ने सन्मानित केले गेले आहे. प्रियांकाच्या अनुपस्थितीत तिच्या आईने दिग्दर्शक महेश भट यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. प्रियांका चोप्राने एक व्हिडीओ संदेश रिलीज करून सर्व संबंधितांना धन्यवाद दिले आहेत.

श्रीदेवी नेहमीच आपली फेव्हरेट ऍक्‍ट्रेस राहिल्या आहेत. त्यांच्या नावाने आपल्याला मिळालेला ऍवॉर्ड निश्‍चितच अभिमानास्पद आहे, असे प्रियांकाने आपल्या व्हिडीओ संदेशामध्ये म्हटले आहे. सलमान खानच्या “भारत’ या बहुचर्चित सिनेमामध्ये प्रियांका सलमानबरोबर दिसणार आहे. हा सिनेमा दक्षिण कोरियाचा सिनेमा “ऑड टू माय फादर’चा हिंदी रिमेक असेल.

“भारत’ पुढील वर्षी ईदच्या सुमारास रिलीज होणार आहे. हॉलिवूडची कामे संपवून प्रियांका आता पुन्हा बॉलिवूडमध्ये सक्रिय होते आहे. तिच्या प्रॉडक्‍शन हाऊसनेही आगामी वर्षभरात काही बिगर हिंदी चित्रपटांची निर्मिती करण्याचे काम सुरू केले आहे. त्यापैकी एक “पाणी’ हा मराठी सिनेमा असणार आहे. झारखंडच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रियांकाव्यतिरिक्‍त महेश भट यांनाही “माइलस्टोन ऑफ झारखंड फिल्म पॉलिसी ऍवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)