श्रीदेवीने केली लिप जॉब सर्जरी

मुंबई : आपल्या मुली पाठोपाठ श्रीदेवीनेही लिप जॉब सर्जरी केल्याचं बोललं जात आहे.मुंबईमध्ये एका कार्यक्रमात श्रीदेवीने पती बोनी कपूरसह हजेरी लावली. पण यावेळी तिच्या चेहऱ्यात बदल जाणवत होता.

सोशल मीडियावर व्हायरल झालेले या कार्यक्रमातील श्रीदेवीचे फोटो पाहून तिने लिप जॉब केल्याचं म्हटलं जात आहे. दिग्दर्शक अनुराग बासूने केलेल्या सरस्वती पुजेसाठी श्रीदेवी आली होती. गॉगल आणि कॅज्युअल लूकमध्ये श्रीदेवीने या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.पण यावेळी तिच्या बदललेल्या ओठांच्या आकारावर सगळ्यांच्या नजरा जात होत्या. तिने लिप सर्जरी केल्याचं म्हटलं जात आहे.याबाबत विचारलं असता, “मी कोणतीही सर्जरी केली नसल्याचं ती म्हणाली. मी आरोग्यदायी आयुष्य जगते. पॉवर योगा करते. शिवाय समतोल आहार घेते,” असंही तिने सांगितलं.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)