श्रीदेवीचा रोल साकारणार रकूल प्रीत सिंह 

दक्षिणेतील महान कलाकार एन.टी. रामाराव अर्थात “एनटीआर’ यांच्या जीवनावर लवकरच बायोपिक बनवणार असल्याचे डायरेक्‍टर क्रिश यांनी काही महिन्यांपूर्वीच जाहीर केले होते. सध्या क्रिश “मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ बनवण्याच्या कामात व्यस्त आहेत. आता या सिनेमाचे काम संपत आले आहे. त्यामुळे “एनटीआर’ यांच्यावरील बायोपिकची जुळवाजुळवही सुरू झाली आहे. “एनटीआर’ यांच्याबरोबर अभिनेत्री श्रीदेवीने एकूण 14 सिनेमे केले आहेत. त्यामुळे या सिनेमात श्रीदेवीचा रोल असणे स्वाभाविक आहे.
श्रीदेवीच्या निधनानंतर तिचा रोल कंगणा रणावत, श्रद्धा कपूर किंवा सोनाक्षी सिन्हाला दिला जाईल, अशी चर्चा होती. मात्र क्रिश यांनी या तिघींना बाजूला ठेवून श्रीदेवीच्या रोलसाठी रकुल प्रीत सिंहची निवड केली आहे. रकुल प्रीत सिंह ही तेलगू भाषिक आहे आणि तिने दक्षिणेकडील अनेक सिनमांमध्ये कामही केले आहे. तिला हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्येही खूप चांगले ओळखले जाते. यापूर्वी सिद्धार्थ मल्होत्रा आणि मनोज वाजपेयीबरोबर “अय्यारी’मध्ये ती होती. तसेच दक्षिणेकडच्या प्रेक्षकांमध्ये ती विशेष लोकप्रिय आहे, म्हणूनच तिला प्रथम प्राधान्य दिले गेले असल्याचे निर्मात्यांच्यावतीने सांगण्यात आले. सध्या रकुलच्या तारखा निश्‍चित करण्याचे काम सुरू आहे. “एनटीआर’च्या बायोपिकमध्ये श्रीदेवीचा रोल अगदी छोटासाच पण महत्वाचा असणार आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)