श्रीदेवींच्या भूमिकेत रकुल प्रीत सिंग 

मुंबई – बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी साकारलेल्या भूमिका आणि त्यांचा अभिनय आजही चाहत्यांच्या मनात तसाच आहे. बॉलिवूडने त्यांच्या निधनाने त्यांच्या रूपातील पडद्यावरील निखळ चांदणी गमावली. रकुल प्रीत सिंगला अशा या अभिनेत्रीची भूमिका पडद्यावर साकारण्याची संधी मिळाली. पण तिने या भूमिकेसाठी घेतलेले मानधन ऐकून तुम्हाला नक्कीच आश्‍चर्याचा धक्का बसेल.
एनटीआर यांच्यासोबतही श्रीदेवींनी अनेक चित्रपट केले असल्यामुळे श्रीदेवींचेही पात्र एनटीआर यांच्या जीनवप्रवासावर आधारित चित्रपटात असणार आहे. अभिनेत्री रकुल प्रीत सिंगला ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. तिची या चित्रपटात केवळ 20 मिनिटांची भूमिका आहे. तिने या 20 मिनिटांसाठी 1 कोटी रूपयांचे मानधन घेतले आहे. हा चित्रपट 2 भागांत प्रदर्शित केला जाणार आहे. एनटीआर यांच्या बायोपिकचा पहिला भाग “कथानायकुडू’ या नावाने 9 जानेवारीला प्रदर्शित केला जाणार आहे, तर दुसरा भाग “महानायकुडू’ या नावाने 24 जानेवारीला प्रदर्शित करण्यात येईल. या बायोपिकमध्ये विद्या बालन मुख्यमंत्री एनटी रामाराव यांच्या पहिल्या पत्नीच्या भूमिकेत झळकणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)