श्रीगोंद्यात 42 किलो प्लॅस्टिक जप्त; दहा हजार दंड

प्लॅस्टिक बंद मोहिमेत नगरपालिकेचे कर्मचारी सक्रिय तर नगरसेवकांची पाठ

श्रीगोंदे – पालिका कर्मचाऱ्यांनी प्लास्टिक बंदी मोहिमेत सक्रीय सहभाग घेऊन 42 किलो प्लास्टिक जप्त करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. नगरपालिका कर्मचाऱ्यांनी प्लॅस्टिक बंदीबरोबरच सुका व ओला कचरा वेगळा करून घंटा गाडीमध्ये जमा करण्यासाठी घराघरात जाऊन जनजागृती मोहीम सुरू केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नागरिक या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. पालिकेचे कर्मचारी कार्यालयीन कामकाज पाहून पर्यावरण संतुलनासाठी व प्लॅस्टिक बंदीच्या विरोधात सक्रीय असले तरी नगरसेवक मात्र या मोहिमेपासून फटकून आहेत. नगरसेवकांना ही पालिका कर्मचाऱ्यांची जबाबदारी वाटते की आपापल्या प्रभागातील समस्यांबाबत नागरिकांना तोंड द्यावे लागेल, या भीतीपोटी नगरसेवक दूर रहाणे पसंत करत असावेत असे नागरिकांना वाटते.
पालिका कर्मचाऱ्यांनी प्लॅस्टिक बंदी मोहिमेत सक्रीय सहभाग घेऊन 42 किलो प्लॅस्टिक जप्त करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्या प्रमाणेच शासनाने राबविलेल्या प्लॅस्टिक बंदी व स्वच्छता अभियानात उत्सफूर्त सहभाग घेऊन पर्यावरण संतुलन व संवर्धनासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही मुख्याधिकारी व्ही. बी. दातीर यांनी केले.

मुख्याधिकारी व्ही. बी. दातीर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका कर्मचारी एस. पी. जोशी, आर. एम. भणगे, विष्णू चव्हाण, पी. डी. मोटे, डी. ए. कविटकर, व्ही. बी. पाचपुते, आर. व्ही. डांगे, आर. एम. गोंधळी, आर. पी. साठे, सुरज घोडके व शरद घोडके यांनी प्लॅस्टिक बंदी मोहिमेत सक्रीय सहभाग घेतला. प्रत्येक दुकानात जाऊन सुरज घोडके व शरद घोडके यांनी प्लॅस्टिक पिशव्यांचा शोध घेऊन जप्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)