श्रीगोंद्यात 20 हजाराची चोरी

श्रीगोंदे – श्रीगोंदा शहरातील शिवाजी चौक व नगरपरिषद इमारती दरम्यान राहणाऱ्या महेंद्र भंडारी यांच्या घरी गुरुवारी पहाटे चोरी झाली. यामध्ये भंडारी यांच्या घरातील 20 हजारांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली.
श्रीगोंदा पोलीस ठाण्यात याप्रकरणी महेंद्र चंपालाल भंडारी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भंडारी यांचा वाड्याची मागची बाजू बाह्यवळण रस्त्यालगत आहे. या अडबाजूचा फायदा घेत चोरट्यांनी भंडारी यांच्या वाड्याच्या भिंतीवरून वाड्यात प्रवेश केला. भंडारी कुटुंबीय यावेळी झोपलेले होते. महेंद्र भंडारी यांच्या एका खोलीची कडी उघडून चोरट्यानी खोलीत प्रवेश केला.
खोलीतील वस्तू अस्ताव्यस्त केल्या. यामध्ये 20 हजारांची रोकड हाती लागताच चोरट्यांनी आल्या मार्गानेच धूम ठोकत सरस्वती नदीच्या दिशेने पलायन केले. पहाटे उठल्यानंतर भंडारी यांना ही घटना कळली.पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्यासह अंकुश ढवळे, प्रकाश वाघ, सॅमीयुल गायकवाड, उत्तम राऊत, दहिफळे आदींनी घटनास्थळी पाहणी केली. श्वानपथकाचे तातडीने पाचारण करण्यात आले. पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)