श्रीगोंद्यात वसुंधरा लेनमधील रहिवाशांचा मतदानावर बहिष्कार

फलक लावून नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा निषेध

श्रीगोंदा: शहरातील प्रभाग क्र. 4 मध्ये असलेल्या वसुंधरा लेनमधील रहिवाश्‍यांनी चक्क मतदानावरच बहिष्कार टाकला आहे. 27 जानेवारीला होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत आपण मतदान करणार नसल्याची भूमिका येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. नगरपरिषदेने या भागात एक रुपयाही खर्च केला नसल्याचा आरोप करीत, येथील मतदारांनी पालिकेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा निषेध केला आहे.

हनुमाननगरच्या पूर्वेकडे असलेले वसुंधरा कॉलनी सध्याच्या प्रभाग क्र. 4 मध्ये येते. येथील नागरिकांनी मंगळवारी सकाळी दर्शनी भागात एक बोर्ड आणून लावला. त्यावर लिहले आहे की, आजी-माजी नगरसेवक व नगराध्यक्षांनी आमच्या कॉलनीमध्ये पालिकेच्या स्थापनेपासून एक रुपयाही खर्च केला नाही. त्यामुळे मत मागावयास आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवक कोणीही येऊ नये. आल्यास अपमान होईल.

या फलकाची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. या वसाहतीच्या चारही बाजूंनी विकास कामे झाली आहेत. मात्र हा परिसर, रस्ते, लाईट यापासून अद्याप वंचित आहेत. वर्षानुवर्षे आम्ही मतदान करतोय मात्र परिस्थिती जैसेथेच असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. वसुंधरा लेनमधील नागरिकांच्या या भूमिकेने शहरवासीयांचे लक्ष्य वेधले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)