श्रीगोंद्यात रेल्वे लुटीचा प्रयत्न फसला

श्रीगोंदा: तालुक्‍यातील श्रीगोंदा रेल्वे स्थानकावर शनिवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास वाराणसी-हुबळी एक्‍सप्रेस लुटण्याचा प्रयत्न झाला. मात्र, रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांच्या सतर्कतेमुळे हा अनर्थ टळला. शस्रधारी सुरक्षा जवानांना पाहताच दरोडेखोरांनी अंधारात धूम ठोकली.

याबाबत सविस्तर असे की, वाराणसी-हुबळी ही एक्‍सप्रेस गाडी शनिवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास श्रीगोंदा रेल्वे स्थानकावर क्रॉसिंगमुळे थांबली होती. गाडी थांबल्यानंतर दरोडेखोरांनी आरडाओरडा करीत सांकेतिक भाषेत एकमेकांना संदेश दिले. तिकीट निरीक्षक ए. बी. गडदे आणि डी. एल. थोरात यांना या हालचाली संशयित वाटल्याने त्यांनी रेल्वेतील सुरक्षा जवान दादा येडे, अमोल साळवे, जी. आर. काळे यांच्याशी संपर्क साधून याबाबत कल्पना दिली.शस्रधारी रेल्वे सुरक्षा जवान आपल्याकडे येत असल्याचे लक्षात येताच दरोडेखोरांनी उड्या टाकून अंधारात धूम ठोकली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र, या गडबडीत त्यातील एकाची पिशवी खाली पडली.या पिशवीत चाकू, एअर पिस्तुल आणि दोन मोबाईल आढळून आले. तिकीट निरीक्षक व रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे रेल्वे लुटीचा प्रयत्न फसला. याबाबत रेल्वे सुरक्षा जवानांनी सांगितले की, श्रीगोंदा रेल्वे स्थानकावर पळून गेलेले सात-आठ जण कोपरगाव रेल्वे स्थानकावरून वाराणसी – हुबळी एक्‍स्प्रेसच्या स्लीपर कोच मध्ये बसले. ते सर्व जण एकमेकांशी मराठीत बोलत होते, असे ही जवानांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)