श्रीगोंद्यात पोलीस ठाण्यात इफ्तार पार्टी

संग्रहित फोटो

श्रीगोंदे- श्रीगोंदे पोलीस ठाण्याच्या वतीने रमजान महिन्यानिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. प्रशासकीय अधिकारी, राजकीय पदाधिकारी, पत्रकार व मुस्लीम बांधवांच्या उपस्थितीमध्ये पोलीस प्रशासनाने एकात्मतेचा संदेश दिला.

सालाबादप्रमाणे पोलीस ठाण्यात इफ्तार पार्टी आयोजित केली जाते. मात्र, यावेळेस या इफ्तार पार्टीत मोठा उत्साह व आनंद पाहायला मिळाला. तसेच, समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झालेले पाहायला मिळाले. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या वेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते, कर्जत पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे, तहसीलदार महेंद्र माळी, ज्येष्ठ नेते घनश्‍याम शेलार, नगराध्यक्ष मनोहर पोटे आदींनी मुस्लीम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या.

-Ads-

मुस्लीम धर्मगुरू मौलाना मोहिनुद्दीन अत्तार, मौलाना शमीम यांसह मुस्लीम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी प्रा. तुकाराम दरेकर, प्रशांत दरेकर, केशव मगर, सतीश पोखरणा, नंदकुमार ताडे, संतोष क्षीरसागर, संतोष खेतमाळीस, भाऊसाहेब गोरे, सतीश मखरे, अरविंद कापसे, प्रा. सुनील माने, राजेंद्र उकांडे, चांगदेव पाचपुते यांसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)