श्रीगोंद्यात पावसाचा जोर कायम!

संग्रहित छायाचित्र

श्रीगोंदा- पावसाळ्याच्या सुरुवातीला तोंड दाखवल्यानंतर तालुक्‍यात पावसाने दोन महिने दडी मारली होती. मात्र गेल्या आठवड्याभरापासून तालुक्‍यात पावसाचा जोर कायम आहे. गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसाने तालुक्‍यातील शेतकरी चांगलाच समाधानी झाला आहे.

मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी तालुक्‍यात पावसाने शेवटी हजेरी लावली. मात्र अपेक्षित पाऊस झाल्याने तालुक्‍यात समाधानाचे वातावरण पाहावयास मिळत आहे. गेली दोन महिने पावसाने दडी मारल्याचा चांगलाच परिणाम तालुक्‍यात दिसू लागला होता.हाताशी आलेली पिके पाण्याअभावी जळू लागल्याने शेतकरी वर्ग तर चिंतेत सापडला होता. शिवाय पावसाच्या अभावाचा तालुक्‍याच्या बाजारपेठेवर देखील मोठा परिणाम पाहायला मिळत होता. तब्बल दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर तालुक्‍यात पावसाने हजेरी लावली.घोड, कुकडीचे आर्वतन आणि पाऊस एकामागे एक आल्याने शेतकरी समाधानी झाला आहे. बहुतांशी भागातील जळु लागलेली पिके आणि फळबागांना संजीवनी मिळाली.

तालुक्‍यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने हळूहळू बाजारपेठा फुलून दैनंदिन जीवनमान पुन्हा पूर्वपदावर येऊ लागले आहे. सोमवारी (दि.28) श्रीगोंदा शहरासह तालुक्‍यातील हिरडगाव, काष्टी, लोणीव्यंकनाथ, शिरसगाव, बोडखा, कोळगाव, घारगाव या भागात पावसाने दमदार हजेरी लावली. मंगळवारी देखील श्रीगोंदा शहरात पावसाने चांगली हजेरी लावली. गेल्या आठवड्याभरात तालुक्‍यात झालेल्या पावसाने तालुक्‍यचे रुपडे पालटून टाकले आहे.

तालुक्‍यातील पावसाची आकडेवारीः श्रीगोंदा- 46,पेढगाव 43, काष्टी 31, चिंभळे- 4, बेलवंडी- 17, मांडवगण- 5, कोळगाव- 11 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)