श्रीगोंद्यात कोणता नेता कोणाबरोबर समजणे अवघड

श्रीगोंदा – श्रीगोंदा तालुक्‍याच्या राजकीय पटलावरील नेत्यांमध्ये कोण कोणाचा मित्र व कोण विरोधक हे समजणे मोठे कठीण आहे. येथील राजकारणाचे आकलन सोपे नाही, अशा शब्दात युवा नेते सुजय विखे यांनी तालुक्‍यातील राजकीय घडामोडींबाबत मनोगत व्यक्‍त केले.

युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष फिरोज जकाते यांच्या पेट्रोल पंपच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. शिवसेनेचे जिल्हा समन्वयक घनश्‍याम शेलार अध्यक्षस्थानी होते. डॉ. विखे म्हणाले, कार्यक्रमाला येताना मला उशीर झाला कारण इथले खराब रस्ते. त्यासाठी आता 600 कोटी आल्याचे पाचपुतेंनी सांगितले. कोटीतील आकडे मी कायमच ऐकतो. रस्त्याचे नशीब केव्हातरी बदलतील. इथल्या व्यासपीठावर पाहिले तर भिन्न पक्षाचे नेते एकत्र दिसताहेत. आमच्याकडे (प्रवरेला) असे अपवादाने घडते. पत्रिकेतील नावे देखील सर्वसमावेशक आहेत. मला नेहमी प्रश्न पडतो येथील कोणता नेता कोणाबरोबर आहे हे कसे काय ओळखायचे. कोण कोणाचा मित्र व शत्रू याची सरमिसळ झाली आहे. मला हे सारे समजून घ्यावे लागेल. म्हणूनच श्रीगोंद्याच्या राजकारणाबाबत खूप विचारपूर्वक बोलावे लागते.

नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे डॉ. विखेंचा संदर्भ घेत म्हणाले, इथल्या राजकारणाबाबत तुम्ही केलेली टीप्पणी रास्त आहे. तुम्हाला जे प्रश्‍न पडतात त्यांचा आम्ही रोजच सामना करतोय. आमची काय हालत होत असेल तुम्ही समजून घ्या. आज इथं तर उद्या तिथं अशा माकड उड्यांची आमच्या तालुक्‍यात विपुलता आहे. कामापुरताच नेता व पक्ष ते झाले की चालले दुसऱ्या दारात. याची इथे भरमार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)