श्रीगोंद्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

श्रीगोंदे: श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे तीन दिवस उरल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. रविवारी दिवसभर राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडीने व भाजपने इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. इच्छुकांचा बायोडाटा पाहत त्यांना संबंधित प्रभागाविषयी प्रश्‍न विचारण्यात आले.

येथील सोनिया गांधी तंत्र निकेतन महाविद्यालयात कॉंग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या या मुलाखती झाल्या. नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, आमदार राहुल जगताप, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, प्रशांत दरेकर, हरिदास शिर्के यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. नगरसेवक सतीष मखरे यांनी प्रभाग क्र. 1 साठी, गौरी गणेश भोस यांनी प्रभाग क्र. 2 साठी तर, प्रा. बाळासाहेब बळे यांनी प्रभाग क्र. 4 साठी दिलेल्या मुलाखती चर्चेचा विषय ठरल्या. भाजपच्या मुलाखती माऊली निवस्थानी पार पडल्या. खा. दिलीप गांधी, प्रा. भानुदास बेरड, माजी मंत्री बबनराव पाचपुते, अल्लाउद्दीन काझी, प्रसाद ढोकरीकर यांनी मुलाखती घेतल्या. नगरसेवक पदाच्या 19 जागांसाठी 40 जणांनी तर, नगराध्यक्ष पदासाठी छाया गोरे, सुनीता शिंदे, डॉ. सुवर्णा होले व जयश्री कोथिंबीरे यांनी मुलाखत दिली. तर नंदकुमार बोरुडे यांच्या कन्या ऍड. दीपाली बोरुडे, प्रभाग क्र. 6, 8 आणि 9 या प्रभागासाठी मुलखात दिली आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)