श्रीगोंद्यात अंत्यविधी प्रसंगी पुन्हा दफनभूमीचा वाद

हिराबाई हिरणावळे यांचा अंत्यविधी रोखला

श्रीगोंदा  – येथील खंडोबा मंदिर परिसरात असलेल्या हिंदू दफनभूमीचा वाद आज पुन्हा एका अंत्यविधी प्रसंगी उद्‌भवला. प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर हा अंत्यविधी पार पडला, मात्र याप्रश्‍नी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

येथे खंडोबा मंदिर परिसरात अनेक वर्षांपासून महानुभाव पंथ, लिंगायत व गवळी समाज येथे दफनविधी करतात. मागील काही वर्षांपासून हिंदू दफन भूमी व शेजारील खेतमाळीस कुटुंबीय यांच्यात जागेवरून वाद सुरू झाला आहे. हद्दनिश्‍चित करण्यावरून हा वाद आहे. दरवेळी अंत्यविधी प्रसंगी हा प्रश्‍न उद्‌भवतो. आज (दि.12) हिराबाई वामन हिरणावळे (रा.गवळी गल्ली, श्रीगोंदा) यांचे निधन झाले. त्यांचा अंत्यविधी करण्यास गेलेल्या लोकांना खेतमाळीस कुटुंबीयांनी रोखले.

हिरणावळे व खेतमाळीस यांच्यात वाद सुरू झाल्यानंतर तहसीलदार महेंद्र माळी, मुख्याधिकारी विश्‍वभर दातीर व पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर खेतमाळीस यांच्या जागेची व दफनभूमीची अंदाजे सीमा ठरवून त्याठिकाणी हा अंत्यविधी करण्यात आला. प्रत्येक अंत्यविधी प्रसंगी उद्‌भवणाऱ्या या प्रसंगाचा कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी हरिणावळे कुटुंबीयांनी यावेळी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)