श्रीगोंद्यातील रस्त्यांसाठी 28 कोटी 33 लाख निधी: आ. जगताप

श्रीगोंदा: मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री संशोधन विकास योजना वित्तीय वर्ष सन 2018-19 अंतर्गत रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी श्रीगोंदा व नगर तालुक्‍यातील रस्त्यांसाठी 28 कोटी 33 लाख 60 हजार निधी शासनाने मंजुर केला असल्याची माहिती आमदार राहुल जगताप यांनी दिली.

ही सर्व कामे आमदार असतानाच्या काळातील आहेत. ग्रामस्थांशी चर्चा करुन परिसरचा विकास करण्यासाठी पाठपुरावा करुन मंजुर केलेली आहेत. कृपया कोणीही या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करु नये.काही लोकांना तशी सवय असून लोकांनी सत्ता घालवली. मात्र, त्यांची ही सवय जात नसल्याने हे नमूद करावे लागते. त्यांना सत्ता दिली असताना जे जमले नाही ती विकासाची कामे मी या पाच वर्षात पुर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. असे ते म्हणाले.

मंजूर रस्त्यामध्ये श्रीगोंदा तालुक्‍यातील घोगरगाव ते बांगर्डे रस्ता (भाग घोगरगाव ते रूईखेल रस्ता) 2 कोटी 31 लाख 67 हजार, ढवळेवाडी रस्ता प्रजिमा 61 (भाग भानगाव ते टाकळी लोणार) 4 कोटी 15 लाख 06 हजार, कोळगाव (तालुका हद्द) ते गुंडेगाव रस्ता ग्रा.मा. 12- 1 कोटी 68 लाख 01 हजार, बेलवंडी, लोणीव्यंकनाथ ते शिरसगाव हद्द रस्ता- 4 कोटी 29 लाख 95 हजार, गणेशवाडी ते हनुमंतवाडी रस्ता- 2 कोटी 64 लाख 12 हजार, तर नगर तालुक्‍यामधील वडगाव तांदळी साकत ते मांडवे रस्ता (भाग वडगाव तांदळी ते साकत रस्ता)- 2 कोटी 31 लाख 67 हजार, वडगाव तांदळी ते कामठी रस्ता (भाग राळेगण, धनगरवाडी ते वडगाव तांदळी रस्ता) 2 कोटी 25 लाख 40 हजार व मुख्यमंत्री ग्रामसडक संशोधन व विकास योजने अंतर्गत श्रीगोंदा ते टाकळी कडेवळीत रस्ता कि.मी. 0.00 ते 8.500 साठी 6 कोटी 35 लाख 41 हजार, श्रीगोंदा ते आढळगाव रस्ता नुतनीकरण करणे कामे 2 कोटी 76 लाख 37 हजार निधी मंजुर झालेला आहे. असे श्रीगोंदा – नगर तालुक्‍यातील रस्त्यांसाठी एकुण 28 कोटी 33 लाख 60 हजार निधी शासनाने मंजुर केलेला आहे.

या कामांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत समावेश होण्यासाठी प्रस्ताव दाखल करुन वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यानुसार मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत शासनाने या कामांना मंजुरी दिली आहे. सर्वांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मी केवळ आश्वासने देत नाही तर प्रत्यक्ष कामावर माझा भर आहे. यापुढे देखील श्रीगोंदा व नगर तालुक्‍यातील विकास कामांसाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार आहे. या रस्त्यांच्या कामासाठी येथील ग्रामस्थांनी वेळोवेळी मागणी केलेली होती. मी इतराप्रमाणे नुसत्याच कोटीच्या गप्पा मारत नाही तर प्रत्यक्ष कामे मंजुर झाल्यावरच बोलतो. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्‍यतील रस्ते दर्जेदार होणार आहेत. तालुक्‍यातील सर्व गावे चांगल्या पक्‍क्‍या रस्त्यांनी जोडण्याचा माझा मानस आहे. गेली 30 ते 35 वर्षे जे रस्ते पक्‍के झाले नाहीत ते आता करण्याचे काम मी करत आहे. असा दावा आ. जगताप यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)