प्रभात वृत्तसेवा
श्रीगोंदे  : भावाच्या विरोधात पोलिसांत दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी वारंवार दबाव वाढत असल्याने अखेर नाजुकी माळशिखऱ्या भोसले (वय अंदाजे 32, रा काष्टी) या तरुणीने श्रीगोंदे पोलीस ठाण्यात विषारी औषध पिऊन जीवनयात्रा संपविण्याचा केलेला प्रयत्न केला. श्रीगोंदे पोलिसांनी तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; मात्र तिला पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले आहे.
या बाबत अधिक माहिती अशी, की नाजुकीने काही दिवसांपूर्वी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तिच्या भावाविरुद्ध मारहाणीची तक्रार दाखल केली होती. ती तक्रार मागे घेण्यासाठी तिला तिचा भाऊ वारंवार मारहाण करून त्रास देत होता. ती आज श्रीगोंदे पोलीस ठाण्यात आली. तिने सहायक पोलीस निरीक्षक नीलेश कांबळे यांची भेट घेतली. “मी दिलेली तक्रार मला मागे घ्यायची आहे; पण माझा भाऊ पुन्हा मला त्रास देईल,’ असे तिने सांगितले. ही घटना पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार व पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्याही कानावर घातल्याचे नाजुकी हिने ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान सांगितले.
नाजुकीने विषारी औषध पिण्याच्या प्रयत्नात कांबळे यांनी हस्तेक्षप केला; पण काही औषध तिच्या पोटात गेले. तिला पुढील उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)