श्रीगोंदे तालुका स्वच्छ व सुंदर होणार 

सभापती लगड : पंचायत समितीत स्वच्छता रथाचे उद्‌घाटन

प्रभात वृत्तसेवा
श्रीगोंदा – तालुक्‍यातील ग्रामीण भाग स्वच्छ गाव सर्वेक्षणमध्ये सहभागी होण्यासाठी पंचायत समितीच्या वतीने गावोगावी जाऊन प्रचार करण्यात येणार आहे. या स्वछता रथाला सभापती पुरुषोत्तम लगड यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रचार रथ रवाना केला.
या वेळी लगड म्हणाले, की नगरपालिका, महानगरपालिकांनी “स्वछ शहर सुंदर शहर’ या योजनेत सहभाग घेतला आहे. या योजनेचा ग्रामीण भागात ही प्रसार होण्यासाठी गावपातळीवर स्वछताग्रही नेमले आहेत. त्यांच्यामार्फत प्रत्येक गावातील कुटुंबांना आपले स्वतःचे घर व गाव कशा प्रकारे स्वछ ठेवायचे, याबाबत मार्गदर्शन करणार आहोत. प्रत्येक गाव व घर स्वच्छ ठेवण्यासाठी गावातील पदाधिकाऱ्यांबरोबर नागरिकांनी स्वतःची जबाबदारी ओळखून काम केले, तर निश्‍चितच गावे स्वच्छ व सुंदर होण्यास मदत होईल.
तालुक्‍यातील सर्वंच गावांची केंद्रीय समितीकडून स्वच्छतेबाबत तपासणी होणार आहे. त्यातून जी गावे निवडली जातील, त्या गावांना दोन ऑक्‍टोबर रोजी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते पारितोषिक देण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपले गाव स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
या वेळी गटविकास अधिकारी राणी फराटे, पंचायत समितीचे विभाग प्रमुख, स्वच्छता कक्षाचे राहुल साळवे, सागर कुऱ्हे, मंगल मोरे आदी उपस्थित होते.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)