श्रीगोंदा शहरात युवकाचा मृतदेह आढळला

श्रीगोंदा – येथील सिद्धेश्‍वर मंदिरा जवळील काशीकुंडालगत तीस वर्षीय युवकाचा मृतदेह शनिवारी सकाळी आढळला.नारायण रामचंद्र हरिहर असेयुवकाचेनाव आहे. शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास काशीकुंडाजवळ एक मृतदेह आढळून आल्याची चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर घटनास्थळी शहरवासियांनी एकच गर्दी केली. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांचे पथक घटनास्थळी तातडीने दाखल झाले. मृतदेह श्रीगोंदा शहरातील नारायण हरिहर यांचा असल्याचेस्पष्ट झाले. या प्रकरणी हरिहर याचे नातेवाईक गणेश अविनाश चव्हाण याने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात माहिती दिली. नारायणाचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचेसांगण्यात येते. श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. नारायण हरिहर यांच्या मृत्यूमागील नेमके कारण समजू शकले नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)