श्रीगोंदा नगराध्यक्ष पदासाठी 17 उमेदवारी अर्ज

श्रीगोंदा – श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवारी शेवटचा दिवस होता. अपक्ष, पक्ष व इतर सामाजिक संघटना या सर्वांचे मिळून 19 जागा असलेल्या नगरसेवक पदासाठी तब्बल 221 अर्ज तर, नगराध्यक्ष पदासाठी 17 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दाखल अर्जांची संख्या जास्त असल्याने निवडणूक अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती रात्री उशीरापर्यंत मिळू शकली नाही.

आज दिवसभर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बहुतांश उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह येऊन शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी व कॉंग्रेस, भाजप व शिवसेना यांनी सगळ्या जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. वरील पक्षांनी ए व बी अशा दोन्ही ठिकाणी उमेदवार दिले आहेत. दोन व तीन प्रभागातील अपवाद वगळता ए अर्जावरील नावे कायम राहतील. छाननी व माघार अद्याप बाकी असले तरी, मुख्य पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केल्याने बरेचसे चित्र आजच स्पष्ट झाले आहे. भाजपने नगराध्यक्ष पदासाठी ए अर्ज सुनीता मछिंद्र शिंदे व बी अर्ज छाया शांताराम गोरे यांच्या नावाने भरला आहे. तर शिवसेनेच्यावतीने विद्या संजय आनंदकर, मीनल मोहन भिंतडे यांनी तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने शुभांगी मनोहर पोटे व रुक्‍मिणी विनोद पोटे यांचे अर्ज दाखल केले आहेत.

भाजपचे 19 जागांसाठी असलेले क्रमांक एकचे उमेदवार पुढीलप्रमाणे 

प्रभाग क्र. 1 अ – रेखा लोखंडे, 1 ब – सतीश कन्हेरकर, प्रभाग क्र. 2 अ – सुनीता खेतमाळीस, 2 ब – संतोष खेतमाळीस, प्रभाग क्र. 3 अ – संग्राम घोडके, 3 ब – दिपाली औटी, प्रभाग क्र. 4 अ – वनिता क्षिरसागर, 4 ब – संतोष दरेकर, प्रभाग क्र. 5 अ – सुनील वाळके, 5 ब – लताबाई खेतमाळीस, प्रभाग क्र. 6 अ – मनीषा लांडे, 6 ब – आसाराम खेंडके, प्रभाग क्र. 7 अ – साखरबाई घोडके, 7 ब – भरत नाहाटा, प्रभाग क्र. 8 अ – ज्योती खेडकर, 8 ब – रमेश लाढाणे, प्रभाग क्र 9 अ – नवनाथ कोथिंबीरे, 9 ब – शुभांगी होले, 9 क – छाया गोरे

तर राष्ट्रवादी व कॉंग्रेस आघाडीचे 19 जागांसाठी असलेले क्रमांक 1 चे उमेदवार पुढीलप्रमाणे :- प्रभाग क्र 1 अ – संगीता मखरे, ब- पांडुरंग पोटे, प्रभाग क्र 2 अ – साधना राऊत, ब – गणेश भोस, प्रभाग क्र 3 अ – मनोज ताडे, ब – अनिता औटी, प्रभाग क्र 4 अ – प्रमिला कुंभार, ब – मनोहर पोटे, प्रभाग क्र 5 अ – विकास बोरुडे, ब – अलका मोटे, प्रभाग क्र 6 अ – वैशाली आळेकर, ब – अख्तर शेख, प्रभाग 7 अ – सोनाली घोडके, ब – निसार बेपारी, प्रभाग 8 अ – मनीषा आंनदकर, ब – बापूराव सिदनकर, प्रभाग 9 अ – संतोष कोथिंबीरे, ब- सीमा प्रशांत गोरे, क – शशिकला गांजुरे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)