श्रीगोंदा तालुक्‍यातील वेळू येथे डाळींब चोराला पकडले

श्रीगोंदा – तालुक्‍यातील वेळू येथील रहिवासी सुदाम सीताराम औटी (वय 45 ) यांच्या शेतातून डाळींब चोरून नेणाऱ्या आरोपीला लोकांनी पकडून रविवारी पोलिसांच्या ताब्यात दिले. पैसा, दागिने, देवळातून देव यापाठोपाठ आता शेतातून डाळींबाचीदेखील चोरी होऊ लागली आहे.

याबाबत माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्‍यातील वेळू येथील रहिवासी सुदाम सीताराम औटी यांच्या 2 एकर शेतात डाळींब शेती आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या व आजूबाजूच्या लोकांच्या शेतातून डाळींब चोरीला जात होते, पण चोर काही सापडत नव्हते. परंतु दि.12 रोजी सकाळी 11 वाजता औटी हे त्यांच्या उसाला पाणी देण्यासाठी शेतात जात असताना रस्त्याच्या बाजूला त्यांच्या शेतात एक गोणी भरलेल्या अवस्थेत त्यांना दिसली. औटी यांना शंका आल्यामुळे त्यांनी ती गोणी उघडून पाहिली असता त्यामध्ये डाळींब असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी आजूबाजूला पाहणी करून पुन्हा सदर ठिकाणी ते आले तेव्हा डाळींबाने भरलेली गोणी गायब झाली होती. त्यामुळे त्यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलावून उसाच्या शेताला वेढा टाकला, पण त्यात तीन ते चोर पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यातील एक जणाला लोकांनी पाठलाग करून पकडले.

लोकांनी पोलिसांना बोलावून त्याला ताब्यात दिले. या चोरीत जवळपास 20 हजार रुपये किंमतीचे 300 ते 400 ग्रॅम वजनाचे 400 किलो डाळींब चोरीला गेले आहेत. सुदाम सीताराम औटी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अभिषेक नितीन काळे, रा. हेलिपॅड मैदान, श्रीगोंदा, गंड्या बाळू चव्हाण, उद्धव सागर पवार, जॅक (पूर्ण नाव माहीत नाही) रा. चोराचीवाडी या सर्वांविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात संगनमताने चोरी करणे असा गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पो. ना. ज्ञानेश्‍वर पठारे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)