श्रीक्षेत्र वीरच्या विकासासाठी भरीव निधी

  • विजय शिवतारे : विकास आराखड्याची बैठक संपन्न
  • भाविकांना मिळणार पायाभूत सुविधा

परिंचे – श्री क्षेत्र वीर येथे वर्षभर भाविकांची मोठी गर्दी असते. भाविकांना पायाभूत सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने सरकारने भरीव निधींची तरतूद केली असून नियोजित विकास कामांना लवकरच मंजुरी मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली.
श्री क्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथील विकास कामांची पाहणी तसेच नियोजित विकास कामांचा आढावा बैठक श्रीनाथ मस्कोबा भक्त निवासात राज्यमंत्री शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा अधिकारी नवलकिशोर राम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एन. पी. मित्रगोत्री, प्रांताधिकारी संजय आसवले, पुरंदरचे तहसीलदार अतुल म्हेत्रे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रमोद केंबावी, जिल्हा परिषदचे सदस्य दिलीप यादव, पुरंदरचे सभापती अतुल म्हस्के, पंचायत समितीच्या सदस्या अर्चना जाधव, सरपंच माऊली वचकल, वीरच्या ग्रामविकास अधिकारी सुजाता चव्हाण, मंडल अधिकारी भरत भिसे, तलाठी साईनाथ गोसावी, प्रमोद सुरंगे समवेत देवस्थान ट्रस्टचे सर्व विश्वस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून यापूर्वी श्री क्षेत्र वीरच्या विकासासाठी 93 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. तथापी जिल्हाधिकारी यांचा सहभाग असलेल्या इतर संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांची समिती त्वरित नेमण्यात येणार आहे. यात्रा कालावधीमध्ये भाविकांना राहण्याकरीता भक्त निवास, रस्ते दुरुस्ती व इतर आवश्‍यक सोयी सुविधांचा समावेश आराखड्यात करण्याची सूचना शिवतारे यांनी केली. यासाठी वाढीव निधीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवस्थान ट्रस्टचे सचिव तय्यद मुलानी व आभार अध्यक्ष बाळासाहेब धुमाळ यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)