श्रीक्षेत्र विठ्ठलवाडीत विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम

तळेगाव ढमढेरे- टाकाऊ बाटलीपासून सुतळी सिंचनाचा सोशल मीडियाचा उपयोग करून पर्यावरणपूरक सुतळी सिंचन उपकरणाद्वारे विद्यार्थी रोपांना नवसंजीवनी देत आहेत. या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे. श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील श्री पांडुरंग विद्या मंदिरचे कलाशिक्षक प्रवीणकुमार जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ बिसलरी बाटलीचा उपयोग सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओ क्‍लिपद्वारे श्री पांडुरंग विद्यामंदिरच्या परिसरात या मुलांनी लावलेल्या रोपांना पर्यावरणपूरक सुतळी सिंचन उपकरण तयार केलेले आहे. टाकाऊ बिसलरी बाटली व सुतळीपासून पर्यावरणपूरक सुतळी सिंचन उपकरणाद्वारे उपक्रम राबवला आहे. सध्या दुष्काळामुळे पाणीटंचाईच्या झळा जाणवत असल्याने शालेय परिसरात लावलेल्या आपापल्या रोपांना पाणी देण्याचे काम हे विद्यार्थांनी पर्यावरणपूरक उपक्रम राबवून करीत आहेत. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत हा आगळावेगळा उपक्रम राबविल्याने बालचमूंनी लावलेल्या या रोपांना जीवदान मिळणार आहे. विशेषत: सुतळीच्या माध्यमातून बिसलरी बाटलीमधील पाण्यामुळे या रोपांची तहान साधारण आठवडाभर भागवली जाणार आहे. या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्येही पर्यावरणपूरक संदेश रुजवला जात आहे. संस्थेचे अध्यक्ष निवृत्ती गवारे व विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश थोरात यांनी मार्गदर्शक शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
शिरूर तालुका कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष प्रवीणकुमार जगताप म्हणाले की, शिरूर तालुक्‍यात सध्या 14 गावांमध्ये तीव्र दुष्काळाचे सावट पसरले असून या गावातील युवकांनी टाकाऊ बिसलरी बाटलीचा उपयोग करून पर्यावरणपूरक ठिबक सिंचन प्रकल्प राबवून झाडांना जगविण्याचे काम करावे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)