श्रीक्षेत्र विठ्ठलवाडीत दिवाळी पहाटमध्ये चिंब

तळेगाव ढमढेरे- श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथे दिवाळी पाडव्यानिमित्त दिवाळी पहाट मैफलमध्ये श्रोते मंत्रमुग्ध झाले. यावेळी परिसरातील श्रोते उपस्थित होते. श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथे दिवाळी पाडव्याच्या पहाटे आकाशवाणी कलाकार पंडित हरिश्‍चंद्र गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित दिवाळी पाडवा मैफल कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन जिल्हा परिषद सदस्य रेखा बांदल, पंचायत समिती सदस्य अर्चना भोसुरे व सामाजिक कार्यकर्त्या पूजा प्रदीप कंद यांच्या हस्ते करण्यात आले. गायन डॉ. राजश्री महाजनी व माधुरी करंबेळकर यांनी केले. संगीत साथ राजू गोपाल गोसावी, अमोल जोशी यांनी दिली. निवेदन गजानन महाजनी यांनी केले. यावेळी माजी सरपंच अलका राऊत, उपसरपंच जयेश शिंदे, सोसायटीचे चेअरमन काळूअण्णा गवारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक संभाजी गवारे, माजी उपसरपंच बाबाजी गवारे, दिलीप गवारे, बाळासाहेब गवारे, बबन गवारे, बापू पवार, लक्ष्मण गवारे, जगन्नाथ गवारे, उद्योजक युवराज गवारे, ऍड.संतोष गवारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन प्राध्यापक संदीप गवारे, प्रवीणकुमार जगताप, उद्योजक संतोष गवारे यांनी केले. सूत्रसंचालन संदीप गवारे यांनी केले, तर आभार उपसरपंच जयेश शिंदे यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
11 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)