श्रीक्षेत्र विठ्ठलवाडीच्या सरपंचपदी ललिता गाडे

तळेगाव ढमढेरे- श्री क्षेत्र विठ्ठलवाडी गावची निवडणूक अडीच वर्षांपूर्वी जिल्हा बॅंकेचे संचालक निवृत्तीअण्णा गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मार्केट कमिटीचे संचालक राहुल गवारे यांच्या नेतृत्वाखाली सर्वच्या सर्व जागेवर 11 उमेदवार निवडून आले होते. मात्र, सरपंच पद ओबीसी महिला राखीव असल्यामुळे सुरुवातीला अडीच वर्षाच्या कालावधीसाठी अलका राऊत यांची निवड बिनविरोध सरपंच म्हणून संधी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा कार्यकाल संपल्याने त्यांनी राजीनामा दिल्यानंतर पद रिक्त झाले. या जागेवर आता ललिता मोहन गाडे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथे राहुल गवारे यांच्या नेतृत्वाखाली माजी सरपंच अलका राऊत यांच्या कालावधीमध्ये अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये हागणदारीमुक्त गाव, स्मार्ट ग्राम, तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्कार, गावाला “क’वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा तसेच गावात अनेक विकासाची कामे करण्यात आली आहेत.
यादरम्यान गावामध्ये महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अमर साबळे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आदी मान्यवरांनी भेटी देऊन गावाच्या विकासाचे कौतुक केले. या निवडीच्या वेळी निवृत्तीअण्णा गवारी, संचालक राहुल गवारे, चेअरमन काळुराम गवारे, उपसरपंच बाबाजी गवारे, राजाराम शिंदे, माजी उपसरपंच दिलीप गवारे, लक्ष्मण गवारे, तानाजी मारणे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष किसन गवारे, रघुनंदन गवारे, दिलीप शेलार, कौशल्या हंबीर, बापुसाहेब पवार, दत्तात्रय गाडे, रमेश शिंदे, ग्रामसेवक दादा भाऊ नाथ आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. मंडल अधिकारी तथा निवडणूक अधिकारी म्हणून उद्धव फुंदे आणि तलाठी गणेश घुमे यांनी काम पाहिले. उपस्थितांच्या वतीने निवृत्तीअण्णा गवारी यांच्या हस्ते नूतन सरपंचाचा सत्कार करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)