श्रीक्षेत्र लेण्याद्रीला यात्रेचे स्वरूप

जुन्नर- श्रीक्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथे गुरुवारी (दि. 24) संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांनी गर्दी केली होती. सुमारे 15 हजारांच्या जवळपास भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. लेण्याद्री परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
पहाटे 4 वाजता देवस्थान ट्रस्टचे खजिनदार सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक आणि महाआरती करण्यात आली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष गोविंद मेहेर, सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, विश्वस्त प्रभाकर जाधव, मच्छिंद्र शेटे, काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, संजय ढेकणे, भगवान हांडे आणि कर्मचारी, तसेच भाविक उपस्थित होते. श्री गिरीजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सकाळी 6 वाजता आणि दुपारी 12 वाजता महाआरती करण्यात आली. देवस्थान ट्रस्टमार्फत भाविकांना विविध सेवा पुरविण्यात आल्या. सायंकाळी मंदिरात श्री मुक्ताई भजनी मंडळ, शिवेची वाडी यांचे भजन झाले. रात्री चंद्रोदयाच्या वेळी श्रींची महाआरती करण्यात आली. यावेळी मोठ्याप्रमाणात भाविक मंदिरात उपस्थित होते. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते. दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच जुन्नर व जुन्नर परिसरातुन आणि पुणे, नगर, मुंबई, ठाणे, नाशिक येथून भाविक श्रींच्या दर्शनासाठी येत होते, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष गोविंद मेहेर व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)