श्रीक्षेत्र मढी येथे अमावस्येनिमित्त भाविकांचा महापूर

पाथर्डी: भटक्‍याची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र मढी येथे शनी अमावस्येनिमित्ताने हजारो भाविकांनी हजेरी लावत चैतन्य कानिफनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी कानिफनाथ गडावर हजेरी लावल्याने गर्दीचा महापूर लोटला होता. अहमदनगर, नाशीक, बीड, औरंगाबाद, पुणे, मुंबई, ठाणे, जालना येथील बहुसंख्येने भाविक गडावर दर्शनासाठी आले होते. प्रचंड गर्दीमुळे व पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन न केल्याने मढीसह निवडुंगे, तिसगाव, करंजी येथे ठीकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नववर्षातील प्रथमच आलेल्या शनी अमावसेमुळे शुक्रवारी (दि.4) रात्रीच भाविकांचा प्रचंड ओघ पहाटेपासुन मढी, मायंबा, वृद्धेश्‍वर येथे होता. मंदीराकडे येणारे सर्वच रस्त्यावर गर्दी ओसंडून वाहत होती. मढी येथे पहाटेच्या महाआरतीनंतर गडाच्या पुर्व दरवाज्याच्या समोर दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. अपुरा पोलीस बंदोबस्तामुळे वाहतुकीचे नियोजन पुर्णपणे कोलमडले. रस्तावर ठिकठिकाणी आडवी तिडवी लावण्यात आलेली वाहने व मढी येथे व्यवसायकांच्या रस्त्यावरच्या अतिक्रमणामुळे भाविकांना नेहमीप्रमाणेच त्रास सहन करावा लागला. मढी येथे दर्शनासाठी आलेले भाविकांनी मच्छिंद्रनाथ गड व वृध्देश्‍वर येथेही दर्शनाचा लाभ घेतला.

नाथकालीन शनिस्थान असलेले श्री क्षेत्र सावरगाव येथील स्वयंभु शनिदेवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होती. आज पहाटे विविध मान्यवरांनी शनीला तैलभिषेक करूण महापुजा केली. शनीला अर्पण करण्यात येणाऱ्या साहित्याची दुकाने थाटली होती. सुमारे एक किलोमीटर पर्यंत दर्शनरांग दिवसभर होती. देवस्थानचे अध्यक्ष अण्णासाहेब मरकड, सचिव सुधीर मरकड, विश्‍वस्त शिवाजी मरकड, भाऊसाहेब निमसे, गोरख कुटे, दिपक साळवे यांनी पुर्ण वेळ गडावर दर्शन रांगेत थांबवुन गर्दीचे नियोजन करत भाविकांची सेवा केली. देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. मच्छिंद्रनाथ देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, वृद्धेश्‍वर देवस्थानचे अध्यक्ष सुधाकर पालवे, मढी देवस्थानचे अध्यक्ष अण्णासाहेब मरकड यांनी येणाऱ्या भाविकांचे स्वागत केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)