श्रीक्षेत्र भीमाशंकर ‘खेड’ तालुक्‍यात

दुरुस्तीचा शासन निर्णय प्रसिद्ध


दैनिक ‘प्रभात’च्या पाठपुराव्याला यश

राजगुरुनगर- बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या खेड तालुक्‍यातील तीर्थक्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याच्या शासन निर्णयात नागरिकांच्या मागणीमुळे व दैनिक प्रभातच्या पाठपुराव्यामुळे अखेर श्रीक्षेत्र भीमाशंकरचा उल्लेख खेड तालुक्‍यात करण्यात आला आहे. तसा दुरुस्तीचा शासन निर्णय काल(मंगळवारी) प्रसिद्ध झाल्याची माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

भीमाशंकर विकास आराखड्यात ज्योतिर्लिंग भीमाशंकर (ता. आंबेगाव) असा उल्लेख झाल्याने खेड तालुक्‍यातील नागरिकांच्या भावना दुखावल्या होत्या. याबाबत सर्वत्र चर्चा सुरु होती. यासाठी आंदोलने करण्याचा इशारा खेड तालुक्‍यातील नागरिकांनी दिला होता. खेड तालुक्‍याला तीर्थक्षेत्र भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्षपद मिळाले आणि त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयात तीर्थक्षेत्र भीमाशंकर आंबेगाव तालुक्‍यात दाखविल्याने या देवस्थानवरून नवा वाद सुरु झाला होता.

खेड तालुक्‍यातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या ज्योतिर्लिंग भीमाशंकरचा 149 कोटी रुपयांचा आराखड्याचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला होता. या निर्णयात तब्बल 25 वेळा भीमाशंकर (ता. आंबेगाव) असा उल्लेख झाला होता. त्यामुळे खेड तालुक्‍यातील नेत्यांनी याबाबत टीकेचे रान उठवले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री, पालकमंत्री, वनमंत्री आणि संबंधित विभागाला निवेदने देऊन भीमाशंकरला शासन निर्णयात खेड तालुका असा करावा अशी मागणी करण्यात आली होती.

खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी शासनाच्या नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांना समक्ष भेटून चर्चा केली होती. संबंधित खात्याच्या उपसचिव विद्या हम्पय्या यांना भेटून झालेली चूक तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. दैनिक प्रभातने या वृत्ताला प्रसिद्धी दिली होती. या सर्वांची दखल घेत पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन विभागाकडे पत्रव्यवहार केला. काल याबाबत शासनाने भीमाशंकर विकास आराखडा शासन निर्णयात दुरुस्ती करून हा निर्णय दुरुस्ती करून प्रसिद्ध केला आहे.

खेडसह तालुका आंबेगाव असा बदल
भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात तीर्थक्षेत्र भीमाशंकर तालुका आंबेगावऐवजी तीर्थक्षेत्र भीमाशंकर मंदिर तालुका खेडसह तालुका आंबेगाव असा बदल करण्यात आला आहे. या तीर्थक्षेत्राच्या विकास आराखडा श्रीक्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र तालुका खेड असा वाचण्यात यावा, अशी दुरुस्तीचा निर्णय शुद्दीपत्रक काल (दि. 27) नियोजन विभागाने प्रसिद्ध केला. विकास आराखड्यात सर्व विकासकामे आंबेगाव तालुक्‍यात असल्याने खेड तालुक्‍यातील जनतेची नाराजी कायम असली, तरी शासनाने शासन निर्णयात दुरुस्ती केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्‍त केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)