श्रीक्षेत्र कन्हेरीत रंगला छबिना उत्सव

भवानीनगर- श्रीक्षेत्र कन्हेरी येथे श्रावण महिन्याच्या शेवटच्या शनिवारी मारुती देवाची मोठी यात्रा भरत असल्याने महिन्याच्या चारही शनिवारी मोठ्या थातामाठाथ मारुती देवाचा छबिना काढला जातो. त्याच पद्धतीने शनिवारी (दि. 1) देवाचा छबिना मोठ्या उत्साहात काढण्यात आला होता.कन्हेरी (ता. बारामती) येथील असणारे मारुती देवाचे मंदिर हे पुरातन असून हे जागृत देवस्थान आहे. दरवर्षी श्रावण महिन्यातील शेवटच्या शनिवारी याठिकाणी मोठी यात्रा भारते यावर्षी ही यात्रा शनिवारी (दि. 8) असणार आहे; परंतु श्रावण महिन्यातील चारही शनिवारी मंदिरातील मारुती देवाची पहाटे पासून पूजा करण्यास सुरुवात होते. त्यात मारुती देवास पाहटे साडेचार वाजता जलाभिषेक केला जातो. पाद्यपूजन करण्यात येते, तसेच वाजत गाजत गावातून मारुती देवाचा छबिना काढण्यात येतो. मंदिरात हरिपाठ, प्रवचन, भजन, कीर्तनाचा भाविक लाभ घेत आहेत. दरम्यान, शनिवारी सायंकाळी 4 वाजता येथील असलेल्या कुस्ती आखाडा रंगणार आहे. यासर्व कार्यक्रमाचे नियोजन यात्रा कमेटी व ग्रामस्थ मिळून करतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)