श्रीकृष्णाच्या भूमिकेविषयी आमिर द्धिधा मनस्थितीत

परफेक्‍शनिस्ट आमिर खान महाभारतावर बनत असलेल्या एका वेब सीरिजमध्ये श्रीकृष्णाची भूमिका साकारण्याविषयी चर्चेत आहे. आमिरद्वारे कृष्णाची भूमिका साकारण्याबाबत विरोधाचे स्वरही उमटताना दिसून येत आहेत. त्याचदरम्यान आता आमिरनेदेखील आपल्यावतीने ही भूमिका साकारण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. आमिरचे मानने आहे की हिंदू पुराण खूप जटिल आहे व आता तो महाभारतावर बनत असलेल्या या वेब सीरीजमध्ये काम करण्यासाठी फेरविचार करत आहे. आमिरला “पद्मावत’वरुन झालेल्या वादाची पूर्ण कल्पना आहे व त्यामुळे तो अशा वादांपासून दूर राहणे पसंत करतो. आमिर खान यापूर्वीही असहिष्णुतेवरील आपल्या वक्तव्यामुळे ट्रोलर्सचा शिकार ठरला होता.

देशातील असहिष्णूतेमुळे एक दिवस आपल्याला हा देश सोडून जावे लागेल, असे मत त्याने व्यक्‍त केले होते. त्यामुळे या मुद्यावर केलेल्या मतप्रदर्शनामुळे त्याच्यावर देशभरातून टीका झाली होती व त्यामुळे आमिरला प्रचंड नुकसान सहन करावे लागले होते. आता नवीन वाद ओढवून घेण्याची आमिर खानची तयारी नाही, असे वाटते. “महाभारत’ या ड्रीमप्रोजेक्‍ट सिनेमासाठी त्याला मुकेश अंबानींकडून 1 हजार कोटींचे बजेट आमिर खानने मंजूर करवून घेतले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)