श्रीकाळभैरवनाथ यात्रेत दोन गटांत मारामारी

मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील अवसरी खुर्द येथे श्रीकाळभैरवनाथ यात्रेच्या दिवशी दोन गटांत मारामारी झाली. या प्रकरणी मंचर पोलिसांनी एकवीस जणांवर गुन्हा दाखल केला आहे. परस्पर विरोधी दोन्ही गटांतील प्रमुखांनी एकमेकांच्या विरोधात तक्रारी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
शनिवारी (दि. 1) रात्री सुयश सुरेश जाधव, आकाश सुरेश जाधव, शुभम दत्तात्रय भोर, शुभम एकनाथ भोर, अक्षय वसंत भोर, सागर वसंत भोर, प्रसाद सुनिल भोर, सागर गोपीनाथ भोर, ऋषिकेश संजय भोर, व्यंकटेश पूर्ण नाव माहित नाही (सर्व रा. भोरवाडी) हे बेकायदा गर्दी जमाव करून चार मोटारसायकलवरुन आले. त्यांनी काठयांनी सुकाजी शिंदे यांना मारहाण केली. तसेच शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी संजय गिलबिले करीत आहेत. अवसरी खुर्द येथील आकाश सुरेश गुरव यांना सुदर्शन शिंदे, अनिकेत शिंदे, सुशांत शिंदे, आकाश शिंदे, समीर शिंदे, योगेश शिंदे, प्रशांत शिंदे, अर्जुन शिंदे, मनोज शिंदे, रुपेश घाटकर, अमोल शिंदे (सर्व रा. शिंदेमळा) यांनी मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेचा पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सुनिल शिंदे करीत आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)