श्रीकांत वाघमारे यांचे ग्रामपंचायत सदस्यपद पात्र

अप्पर आयुक्‍तांचे आदेश : न्यायालयीन चौकशीत पुरावा मिळाल्यास नवीन अर्ज करा

वाघोली- तिसऱ्या अपत्याच्या कारणास्तव श्रीकांत वाघमारे यांचे वाघोली ग्रामपंचायत सदस्यपद रद्द ठरविल्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पुणे विभागाच्या अप्पर आयुक्‍तांनी रद्द केले आहेत. श्रीकांत वाघमारे सदस्य म्हणून राहण्यास पात्र असल्याचे आदेश दिले आहेत. मात्र, याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार चालू असलेल्या पोलीस तपासात वाघमारे यांचे तिसरे अपत्य असल्याचा पुरावा मिळाल्यास जिल्हाधिकारी यांच्याकडे नव्याने अपात्रता अर्ज करता येईल.

प्रस्तुत आदेशाचा अडसर येणार नाही, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. आदेशानुसार श्रीकांत वाघमारे यांना मासिक सभांना उपस्थित राहण्याचा व उपसरपंच निवडणुकीत मतदान करण्याचा व ग्रामपंचायत कामकाजात सहभाग घेण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. त्यानुसार शनिवारी (दि. 23) रोजी झालेल्या मासिक सभेमध्ये श्रीकांत वाघमारे यांनी सहभाग घेतला. उपस्थित सदस्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

दरम्यान, तक्रारदार विक्रम वाघमारे म्हणाले की, श्रीकांत वाघमारे यांना अप्पर आयुक्‍तांच्या आदेशाने सदस्य म्हणून राहण्यास पात्रता मिळाली असली तरी याबाबतचे प्रकरण उच्च न्यायालामध्ये प्रलंबित असून चौकशी सुरू आहे. लवकरच सत्य समोर येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)