श्रावण सुरू झाल्याने सर्व प्रकारच्या मासळीच्या भावात सुमारे 10 ते 20 टक्‍क्‍यांनी घट

संग्रहित छायाचित्र

मटण, चिकन स्थिर : तर, अंड्याच्या भावातही घसरण

पुणे – श्रावण महिना सुरू झाल्याने मासळीची मागणी घटली आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या मासळीच्या भावात सुमारे 10 ते 20 टक्‍यांनी घट झाली आहे. सोमवार (दि. 13 ऑगस्ट) मासळीच्या भावात मागणी अभावी मोठी घसरण होईल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे. मटण, चिकनलाही मागणी घटली आहे. तरीही त्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. अंड्याची मागणी घटली आहे. त्यामुळे शेकड्यामगे दोन्ही अंड्याच्या भावात सुमारे 50 ते 60 रुपयांनी घट झाली आहे.
गणेश पेठ येथील मासळी बाजारात खोल समुद्रातील मासळीची 5 टन, खाडीच्या मासळीची 100 ते 200 किलो, नदीच्या मासळीची 500 किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे 5 टन आवक झाली असल्याचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितले.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : 1300, मोठे : 1300 , मध्यम : 700-800 लहान :600, भिला :450, हलवा :550 , सुरमई : 650, मोठे 800 रावस-लहान : 550, मोठे 650 घोळ : 550, करली : 300, भिंग :280, पाला : लहान 600 मोठा 1100, वाम : पिवळी लहान 360 मोठे 600, काळी : 280, ओले बोंबील : लहान 100 मोठे 140, कोळंबी ः टमी प्रॉन्स 180, मोठी : 440 जंबोप्रॉन्स : 1300,किंगप्रॉन्स : 700, लॉबस्टर : 1200, मोरी : लहान 160, मोठे 280, मांदेली : 120 राणीमासा : 180, खेकडे : 160-200, चिंबोऱ्या : 360-440, खाडीची मासळी : सौंदाळे : 240, खापी : 240, नगली : लहान 280 मोठी 480, तांबोशी : 440, पालू : 240, लेपा :लहान 140 मोठे 240, शेवटे : 200 बांगडा : मोठे 200 ,लहान 120; पेडवी : 40, बेळुंजी : 120, तिसऱ्या : 160 खुबे : 120. तारली : 100 नदीची मासळी : रहू : 120, कतला : 140, मरळ : लहान 240 मोठी 400, शिवडा :160 चिलापी : 40, मागुर : 90, खवली :140, आम्ळी : 60 खेकडे : 140, वाम : 480. मटण : बोकडाचे : 480, बोल्हाईचे : 480, खिमा : 480, कलेजी : 520. चिकन : चिकन : 130, लेगपीस : 160, जिवंत कोंबडी : 100, बोनलेस : 240. अंडी : गावरान : शेकडा : 610, डझन : 84 प्रति नग : 7. इंग्लिश : शेकडा : 350 डझन : 54 प्रतिनग : 4.5.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)