श्रावण बालक आश्रमातील मुलांना गणवेश वाटप

रेडा – इंदापूर येथील महिला भागिनींनी आणि व्हिजनरी युथ फाउंडेशनच्या माढा, तालुक्‍यातील सदस्य व इंदापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने अनावश्‍यक खर्चाला फाटा देत इंदापूर येथील श्रावण बालक आश्रमाच्या मुलांना गणवेश वाटप करण्यात आले. तसेच इंदापूर ग्रामीण पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राख्या बांधुन रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आशा आरडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना भारतीय संस्कृतीने स्त्रीला मानाचे स्थान दिले असल्याचे सांगितले त्याचप्रमाणे प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आपली जबाबदारी चोख पार पाडतात. या कार्यक्रमाच्या वतीने “लेक वाचवा हुंडाबूडी झालीच पाहीजे, स्त्रीभ्रुण हत्या रोखली पहिजे व व्यसनमुक्‍ती’ असे संदेश देण्यात आले याप्रसंगी पोलीस निरीक्षक सज्जन हंकारे सर्व कर्मचारी अश्रमाचे संचालक राजीव करडे, फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वाती पवार, पठाण, संचालक मंडळासह नितीन जगदाळे, मारूती बिचुकले, आसमा शेख, प्रियंका घोघरे हे मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)