श्रावणोत्सव सुरू; बाजाराला बहार

पुणे – श्रावण म्हणजे हिरवाईने नटलेली वसुंधरा, व्रतवैकल्ये, सणांची रेलचेल, लहान मुलांपासून ते सुवासिनी, अबालवृद्धांपर्यंत सर्वांचा लाडका महिना. त्याच्या येण्याने सृष्टी बहरते. आपसूकच वातावरणात उत्साहाचे रंग भरतात. अशा या श्रावणाच्या आगमनाने बाजारपेठेत लगबग सुरू झाली आहे. पूजा, व्रत-वैकल्याचे साहित्य यांनी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत.

श्रावणात लोकसंस्कृती मोराच्या पिसाऱ्यासारखी श्रावण सरी सोबत फुलून येते. लोकसंस्कृतीतील कीर्तने, पोथ्या, गीतांमधून श्रावण भक्तीचे रंग उलगडू लागतात. श्रावणला सर्व व्रतांच्या सणांचा राजा म्हटले जाते. या महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा, व्रत करण्याची परंपरा आहे.

-Ads-

श्रावन शुद्ध पंचमी, मंगळागौर, सत्यनारायण, श्रीकृष्ण जन्माष्टमी, आदित्य पूजनाचे साहित्य, दहिहांडीसाठी लागणाऱ्या मातीच्या रंगबीरंगी हंड्या, पोळ्यासाठी लागणाऱ्या बैल जोडी, मंगळागौरीचे साहित्य यामुळे मंडई फुलली आहे. केळीचे खुंट, तुळस, दुर्वा, फुले यांनी बाजारपेठ बहरली आहे. श्रावणात धार्मिक ग्रंथांची पारायणे भाविक श्रद्धेने करतात. त्यामुळे विविध धार्मिक पोथ्या,पुस्तके, ग्रंथ खरेदीसाठी नागरिकांची पाउले आप्पा बळवंत चौक, धार्मिक ग्रंथ विकेत्यांकडे वळू लागली आहे.

मंगळागौरीसाठी पारंपारिक, नवनवीन डिजाईनचे दागिणे, साड्यांनी महिलांची खरेदीचे हक्काचे ठिकाण असलेले तुळशीबागही बहरली आहे. पंचांगानुसार श्रावणापासून सर्व सणांना सुरूवात होते, असे मानले जाते. श्रावण सोमवार, नागपंचमी, रक्षाबंधन असे विविध सण या श्रावणोत्सवात रंग भरणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)