श्रमसंस्कार शिबिरातून स्वच्छ झाले कोपर्डेहवेली

कोपर्डेहवेली  –विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबरच श्रमाचे महत्त्व कळावे. यासाठी कोपर्डे हवेली ता. कराड येथे वेणूताई चव्हाण महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या श्रमसंस्कार शिबिरांतर्गत कोपर्डे हवेली गावासह स्मशानभूमी, नदीची स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमात ग्रामस्थांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

विद्यार्थ्यांनी गावातील अंतर्गत रस्ते, नाले याची साफसफाई केली. तसेच इतर प्रलंबित कामे शिबिराच्या माध्यमातून मार्गी लावली. जुन्या मराठी शाळेची इमारत जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आली. ग्रामपंचायतीच्या वतीने येथे बगिचा करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. येथील कृष्णा नदीपात्रात जलपर्णीचे प्रमाण वाढले होते. तसेच विविध प्रकारचा कचरा साठलेला होता. विद्यार्थ्यांनी जलपर्णीसह कचरा काढण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्मशानभुमिचीही स्वच्छता केली. गावाला पाणी पुरवठा करणारी टाकी असलेल्या ठिकाणचे ग्रामपंचायतीचे सुमारे दोन एकर क्षेत्र स्वच्छ करून सपाटीकरण केले. त्यामुळे ग्रामस्थांच्यावतीने विद्यार्थ्यांच्या या कामाचे कौतुक करण्यात आले. शिबिरात शिवकालीन मर्दानी खेळ सादर करण्यात आले. तसेच थळेंद्र लोखंडे यांचा कवन बरसात कार्यक्रम झाला. नदीची स्वच्छता करण्यासाठी विद्यार्थ्यांना उपसरपंच लक्ष्मण चव्हाण, शुभम चव्हाण, संदीप चव्हाण, आकाश चव्हाण, अक्षय चव्हाण, श्रीकांत झेंडे यांनी सहकार्य केले.

वेणूताई चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा श्रमसंस्कार शिबिराचा उपक्रम स्तुत्य आहे. यामुळे ग्रामस्थांनाही प्रेरणा मिळाली आहे. दोन दिवसांच्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सुविधा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुरविण्यात आल्या आहेत.

लक्ष्मण चव्हाण
उपसरपंच, ग्रामपंचायत कोपर्डे हवेली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)