श्रमसंस्कराची विचारधारा विद्यार्थ्याच्या उत्कर्षाला पूरक ः संतोष चौधरी

सातारा – श्रमसंस्कराची विचारधारा विद्यार्थ्याच्या उत्कर्षाला पूरक ठरते असे मत बोरगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी व्यक्त केले. ते गौरीशंकरच्या सातारा कॉलेज ऑफ फॉर्मसी देगाव या महाविद्यालयाने शेळकेवाडी ता. जि. सातारा येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत सन 2018-19च्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी गौरीशंकरचे संचालक डॉ. अनिरुध्द जगताप जयंवतराव साळुखे प्रशासकिय अधिकारी नितीन मुडलगीकर जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विक्रम पवार कामगार नेते डॉ. शिवाजीराव पवार उघोजक गजानन शेळके सरपंच संतोष शेळके उपसंरपंच अमोल राऊत कृष्णात शेळके तंटामुक्ती अध्यक्ष गजानन कदम प्रा.डॉ. नागेश आलुरकर आदीची प्रमुख उपस्थिती होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ते पुढे म्हणाले आधुनिकेतेच्या युगात प्रगती घडली परंतू माणूसकीचा झरा मात्र हरपत चालला आहे हे समाजामध्ये विदारक चित्र दिसत आहे समाजचे आपण देणे लागतो ही भावनाच लूप्त होत चालली आहे ही खरी आजच्या युगाची शोकांतिका आहे हे चित्र बदलण्यासाठी तरुणाईमध्ये समाजिकतेची जाणीव जागरुक करणे आजच्या काळाची खरी गरज आहे त्यासाठी श्रमसंस्कार सारखी शिबीरे होणे आवश्‍यक आहे

18 ते 24 डिसेंबर या कालावधीमध्ये ग्राम स्वच्छता निर्मल ग्राम अभियान व शोषखड्डे, वृक्षारोपन, रस्ते दुरुस्ती, व्यक्तिमत्व विकास, समुपदेशन आरोग्य शिबीर समाज प्रबोधन आदी उपक्रम विद्यार्थ्यांच्यामार्फत राबविले जाणार आहेत तसेच याकामी शेळकेवाडी ग्रामस्थचे ही सहकार्य लाभत आहे.  यावेळी कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एस. महामुनी प्रा. डॉ. ई. टी तोंबाळी सुत्रसंचालन एस. एस भिसे के. एम डंगारे यांनी केले. व प्रास्ताविक व आभार नामदेव शेळके यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)