श्रमदानाने विकासाची लोकचळवळ सुरू

किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवानिमित्त पत्रकार परिषद
 
पुणे – धुळे जिल्ह्यातील बारीपाड्याला सन 1992 च्या दरम्यान अन्य गावांतून पाणी पुरवठा होत असे. बारीपाड्यामध्ये झालेल्या विकासामुळे 8 गावांना पाणी पुरवठा होत आहे. स्थानिकांची साथ आणि श्रमदानाने बारीपाड्याच्या विकासाची लोकचळवळ सुरू झाल्याचे चैत्राम पवार यांनी सांगितले. ते 13 व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी संयोजक सुप्रिया चित्राव उपस्थित होत्या.

जगातील 78 देशांमध्ये “चांगले गाव कसे असावे’ याविषयातील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार बारीपाड्याला मिळाला आहे. यांसह “आयएफडीए’ या आंतरराष्ट्रीय संस्थेचा पुरस्कार मिळालेला आहे. गावाने गावासाठी तयार केलेल्या नियमांमुळे प्राणी, पक्षांना हक्‍कांचे जंगल मिळाले असून दुर्मीळ वनस्पतींचे संवर्धन झाले आहे. याचबरोबर गावाने गेल्या काही वर्षांत विविध पिकांचे विक्रमी उत्पादन घेतले आहे, असे बारीपाड्याविषयी माहिती देताना चैत्राम पवार यांनी सांगितले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)