श्रमदानात “काटी’ कमी पडता कामा नये

रेड- राज्य शासनाने व सामाजिक संस्था यांनी एकत्र येऊन ग्रामीण भागात वॉटर कप स्पर्धा निर्माण केल्यानेच अनेक वर्षांपासून दुभंगलेली मने, माणसे जवळ आली. तसेच त्यांच्या व ग्रामस्थांच्या श्रमदानामुळेच गावचा कायापालट करण्यासाठी अनोखा प्रयत्न सुरू आहे. यात काटी गाव कमी पडता कामा नये, असे आवाहन तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी केले.
इंदापूर तालुक्‍यातील काटी येथील ग्रामदैवत वेताळ देवस्थान येथे गावचे श्रमदान व सहभाग या संदर्भात तहसीलदार पाटील गावकऱ्यांना मार्गदर्शन करीत होते. इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती विलास वाघमोडे, आदर्श शेतकरी साहेबराव मोहिते, सचिन आरडे, मदन पाटील, हनुमंत बोराटे, सुनिल मोहिते, वैभव वाघमोडे, दीपक बोराटे, रणजित बोराटे, शिवाजी माने, दादासाहेब भोसले, अतुल वाघमोडे, विकास भोसले, गणेश बोराटे, मोहन गुळवे, गणपत लवटे, एस. व्ही. भोसले, अशोक आरडे, शशिकांत कुलकर्णी, आण्णासाहेब सोलनकर, चंद्रकांत भोसले, दीपक गुळवे यांच्यासह गावकरी व ग्रीन काटी परिवाराचे सदस्य उपस्थित होते.
तहसीलदार श्रीकांत पाटील म्हणाले की, आपले गाव पाणीदार करण्यासाठी ज्यांनी प्रशिक्षण घेतले गेले आहे, त्यांना एक तास देखील श्रमदाना शिवाय चैन पडत नाही; परंतु गावातील नागरिकांनी बघ्याची भूमिका न घेता श्रमदानात सहभागी होऊन गावचा चेहरा मोहरा बदलला पाहिजे. शासन तर इतकी मदत करते याला गणती नाही मात्र, फुकट मिळाल्यावर मोल कळत नाही म्हणून आपण श्रमदानात सहभागी झाले पाहिजे. काटी गावातील युवा वर्गाने व नागरिकांनी मनावर घेतल्याने सुरवात चांगली झाली आहे; परंतु जुन्या ओढ्याचा गाळ माती काढताना कित्येक वर्षांपासून केलेली अतिक्रमणे स्वतः काढली जावी व काटी गावचा ओढा अतिक्रमण मुक्‍त करण्यासाठी सहकार्य कले पाहिजे, नाहीतर मी स्वतः लक्ष देवून दंडात्मक स्वरूपाची ठोस कारवाई करणार आहे, असा इशारा तहसीलदार पाटील यांनी दिला.

  • पाण्याची गरज ओळखून श्रमदान करा
    गावच्या कट्ट्यावर बसून अनेकांना कुटाळ करण्याचा धंदा असतो मात्र, या गोष्टीने चांगले होत नसते. आपल्या पुढच्या पिढीला डोळ्यासमोर ठेवून व आगामी पाण्याची गरज ओळखून उदात्त हेतून श्रमदान करण्याची भूमिका ठेवा. जिथे अडचण येईल तिथे शासन नक्की मदत करेल, अशीही ग्वाही तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी दिली.
  • भारतीय जैन संघटनेकडून पोकलेन, जेसीबी
    पाणी फाउंडेश आयोजित वॉटर कप स्पर्धेत काटी गावाने सहभाग घेतला असून गेली 8 ते 10 दिवसापासून गावात विविध स्पर्धा अंतर्गत कार्यक्रम पार पडत आहेत. आज (शनिवारी) तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या हस्ते पूजन करून ओढा खोलीकरण व रूंदीकरण कामाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी भारतीय जैन संघटना पुणे जिल्हा सदस्य अजित नाहार यांनी गावासाठी काम संपेपर्यंत एक पोकलेन व एक जेसीबी मशिन देण्याचे आश्‍वासन दिले. तसेच त्यांनी वैयक्तिक 11हजार रुपये डिझेल खर्च भागवण्यासाठी गावास दिले. तर गावातील नोकरदार व व्यावसायिक यांनी दीड लाखाचा निधी एका दिवसात व्हाट्‌सऍपच्या माध्यमातून जमा केला त्यामुळे कामाची सुरुवात झालेली आहे.
What is your reaction?
9 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)