श्रध्दाचे रिलेशन नक्की कोणाबरोबर?

“रॉक ऑन 2’मध्ये श्रद्धा कपूर आणि फरहान अख्तरबरोबर होते. तेंव्हा या दोघांची ऑफ स्क्रीन केमिस्ट्री खूप छान जमली असल्याची चर्चा सुरू झाली होती. हे दोघेजण रिलेशनशिपमध्ये असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. मात्र, ही चर्चा आणि हे रिलेशनशिप खूपच कमी काळ चालले. या दोघांचा ब्रेकअप झाला आणि श्रद्धाने पुढचा प्रवास सुरू ठेवला.

श्रद्धा कपूरने अनेक कलाकारांबरोबर काम केले आहे. त्यामुळे त्यापैकी एखाद्या कलाकाराबरोबर नाव जोडले जाणे ही बॉलीवूड गॉसिप फॅक्‍टरीसाठी अगदीच सामान्य बाब आहे. त्याचप्रमाणे ब्रेकअप होणे ही पण अगदी सामान्य बाब ओह्‌. आता श्रद्धा पुन्हा नव्या रिलेशनशिपमध्ये असल्याचे समजते आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर रोहन श्रेष्ठबरोबर तिचे डेटिंग सुरू असल्याचे समजते आहे. हे दोघेही बऱ्याच काळापासून एकमेकांना डेटिंग करत आहेत असे जरी बोलले जात असले तरी कोणीही याचा अधिकृत खुलासा केलेला नाही.

श्रद्धाच्या अभिनय क्षेत्राबाबत रोहनला आणि रोहनच्या सेलिब्रिटी फोटोग्राफीबाबत श्रद्धालाही खूप आदर आहे. फक्‍त एकदाच रोहनने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. श्रद्धाबरोबरचे रिलेशन म्हणजे एक अफवा असल्याचे त्याने म्हटले आहे. तो आणि श्रद्धा एकमेकांना 9 वर्षे ओळखत आहेत. एका पार्टीत दोघे भेटले होते. तेंव्हापासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत. रोहनने तर त्याची बाजू स्पष्ट करून सांगितली. पण त्याच्या आयुष्यात कोणीतरी छान मुलगी आहे, हे नक्की. पण ही मुलगी कोण हे सांगायला मात्र त्याने नकार दिला.

श्रद्धाचा “स्त्री’ नुकताच रिलीज झाला. त्यामध्ये राजकुमार राव आणि श्रद्धाबरोबर आणखीन एक स्त्री होती. ही ऍक्‍ट्रेस दक्षिणेतील आघाडीची अॅक्‍ट्रेस आहे. तिचे नाव आहे फ्लोरा सैनी. तिला “स्त्री’मध्ये श्रद्धाच्या बरोबरीने रोल जरी मिळाला असला, तरी श्रेय मात्र मिळाले नव्हते. यात तिला काहीच आक्षेप नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)