श्रद्धा तारुला युवासेनेकडून आर्थिक मदत

भोर- शहरातील भोईआळी येथील श्रद्धा तारु या विद्यार्थिनीने माध्यमिक शालान्त परिक्षेत 94 टक्के गुण प्राप्त करून यश मिळवले असून, तिच्या घरची परिस्थिती हलाखिची असल्याने पुढील शिक्षणासाठी वृत्तपत्राच्या माध्यमातून मदतीची मागणी केली होती. या वृत्ताची दखल घेऊन भोर तालुका युवा सेनेचे प्रमुख आणि माजी नगर सेवक केदार देशपांडे यांनी श्रद्धा तारूसाठी मदतीचा हात पुढे केला. भोईआळी येथील मंदिरात एका कार्यक्रमाचे आयोजन करून रविवारी (दि. 16) शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दत्तात्रय टेमघरे यांचे हस्ते भोर तालुका युवा सेनेच्या वतीने श्रद्धा तारूला 10 हजार) रुपयांची आर्थिक मदत करून, तिचा गौरव करण्यात आला. या वेळी केदार देशपांडे श्रद्धाला पुढील शिक्षणासाठी आडचणीच्या वेळी आर्थिक मदत करण्याचेही जाहीर करुन तिच्या आई-वडिलांना सामाजिक बांधीलकीच्या रूपाने धीर दिला. या वेळी भोर शहर युवा सेना प्रमुख किरण पवार, सुशील तारु, अमित शेवते, यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी, भोईआळीतील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)