श्रद्धा कपूर साकारणार पाक नर्तकीची भूमिका

बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने “हैदर’ चित्रपटात एका काश्‍मिरी मुलीची भूमिका साकारली होती. जिचे प्रेक्षकांनी तोंड भरून कौतूक केले होते. आता “एबीसीडी-2’मध्ये ती भारतीय डान्स ग्रुपशी प्रतिस्पर्धा करताना दिसणार आहे. मात्र, श्रद्धा पहिल्यांदाच एक पाकिस्तानी नागरिक म्हणून एका नर्तकीची भूमिका साकारत आहे.

रेमो डिसूझा याच्या एबीसीडीच्या सिक्‍वलमधील आगामी चित्रपटात ती वरुण धवनसोबत प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. यात वरुण धवन एका भारतीय नर्तकाची भूमिका साकारतोय. यामुळे वरुण आणि श्रद्धा यांच्यातील डान्स स्पर्धा पाहणे प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांचा यापूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटात सुपरहीट ठरला होता. त्यानंतर पुन्हा एकदा ही जोडी “एबीसीडी-2’मध्ये एकत्रित काम करणार आहे. या चित्रपटासाठी जेव्हा श्रद्धा कपूरला कास्ट करण्यात आले, तेव्हापासून चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

दरम्यान, “स्री’ चित्रपटाच्या यशानंतर श्रद्धाचे यावर्षी साहो, छिछोरे, सायना आणि एबीसीडी-2 आदी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांमधून श्रद्धा विविधांगी भूमिका साकारत चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)