श्रद्धा कपूरने घरच्यांसोबत सेलिब्रेट केला गणेशोत्सव

श्रद्धाचे तर लाखों दिवाणे आहेत, पण बॉलीवुडची ही सुंदर मुलगी गणपती बप्पाची अगदी फॅन आहे, आणि म्हणूनच दर वर्षी नियमितपणे श्रद्धा आपल्या घरात बाप्पाचे स्वागत करते. श्रद्धापूर्ण भक्ती आणि उत्सुक्तेने गणेशोत्सव साजरा करते. श्रद्धा जरी आज एक खूप मोठी अभिनेत्री असली तरी ती दर वर्षी गणेश उत्सव पारंपरिक पद्धतीने आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत साजरा करते. ह्यावर्षी देखील तिने घरच्यांसोबत गणेशोत्सव सेलिब्रेट केला.

ह्या वर्षी आशा भोसले यांनी श्रद्धा कपूरच्या घरी बाप्पाचे दर्शनlसाठी उपस्तीती लावली त्यामुळे श्रद्धाचा आनंद दुप्पट झाला. सर्वाना माहितीच आहे की श्रद्धाची आई शिवांगी कोल्हापुरे आणि मंगेशकर कुटुंब हे नातेवाईक आहेत. त्यामुळेच श्रद्धाच्या घरच्या गणेशोत्सवासाठी आशाताई आवर्जुन उपस्थित राहिल्या. यावेळी श्रद्धाच्या घरचे अगदी जवळचे नातेवाईकही उपस्थित होते.

साधेपणाने गणरायाची स्थापना झाली होती. आनंदाने आरती आणि पूजा झाल्यावर सर्वांनी मोदकाच्या प्रसादाचा आनंद घेतला. हे वर्ष श्रद्धासाठी खूप छान आहे. या वर्षात तिचा “हाफ गर्लफ्रेंड’ हिट झाला. “हसीना…’ही त्याच मार्गावर आहे. शिवाय प्रभास बरोबर “साहो’साठी तिची निवड झाल्यानेही ती खुशीत आहे. एवढे यश मिळाले ते गणपतीच्या कृपेमुळेच असे श्रद्धा मानते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)