#श्रद्धांजली: अद्वितीय अटलजी (भाग-२)

तरुण विजय, खासदार 
भारतीय राजकारणातील एक अद्वितीय व्यक्‍तिमत्त्व म्हणजे अटलजी होते. या अजातशत्रू व्यक्‍तिमत्त्वाचे आयुष्यभर भारत देशाचीच आराधना केली. दळवळण क्षेत्रामधील क्रांती, मोबाइल फोन स्वस्त करून घराघरांत पोहोचविणे, भारताचे चार कोपरे सुवर्ण चतुष्कोन राजमार्गाने जोडणे आणि शस्त्रास्त्रनिर्मितीमध्ये भारताला अधिक सक्षम बनविणे ही अटलजींच्या विकासकेंद्रित राजकारणाची उदाहरणे आहेत. समाजातील सर्वांत शेवटच्या थरावरील व्यक्तीची गरिबी दूर करण्यासाठी ते चिंतीत असत. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्म मानवतावाद आणि गांधी चिंतन यावर त्यांची श्रद्धा होती. याचमुळे भाजपच्या निर्मितीनंतर त्यांनी गांधीवादी समाजवाद स्वीकारला. त्यांनी आयुष्यभर भारत देशाचीच आराधना केली. अटलजी आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांचे नेतृत्त्व भारताला नेहमीच दिशा देत राहील. 
केवळ फोटो काढण्यासाठी नको. अटलजी पांचजन्यचे पहिले संपादक असण्याबरोबर पहिले वाचकही होते. ते पंतप्रधान असतानाही आमच्या अंकावर त्यांची प्रतिक्रिया हमखास येत असे. एका स्वदेशीविषयक विशेषांकाच्या मुख्य पृष्ठावर भारतमातेचे द्रौपदी वस्त्रहरणासारखे चित्र होते. ते पाहून अटलजी क्रुद्ध झाले. ते म्हणाले, आम्ही असताना असे चित्र? आम्ही मेलो आहोत काय? संयम आणि शालीनतेशिवाय पत्रकारिता होऊ शकत नाही.
पन्नासच्या दशकामध्ये नेहरूवादी मानसिकतेखाली दुसरी विचारसरणी मानणाऱ्यांवर एकप्रकारची वैचारिक अस्पृश्‍यता लादली जात असे. त्या कालावधीमध्ये अटलजींच्या संपादनाखाली पांचजन्य, राष्ट्रधर्म, स्वदेश, हिंदुस्थानसारखी नियतकालिके प्रसिद्ध होत असत. अटलजींनी या सर्वच नियतकालिकांना एक नवी दिशा दिली. ते संघर्षाचे दिवस होते. अटलजी त्यावेळी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्याबरोबर त्या अडचणींवर मात करून काम करत होते. त्यावेळी अटलजींनी लिहिले,
बाधाएँ आती हैं आएँ, घिरें प्रलय की घोर घटाएँ, 
पावों के नीचे अंगारे, सिर पर बरसे यदि ज्वालाएँ, 
निज हाथो में हॅंसते-हॅंसते, आग लगाकर जलना होगा, 
कदम मिलाकर चलना होगा! 
आपल्या पहिल्या पंतप्रधानपदाच्या 13 दिवसांच्या कारकिर्दीमध्ये अटलजींनी कामकाज सुरू केले, तेव्हा मी त्यांना म्हटले, की सरकार सर्व प्रकारच्या यात्रांना मदत करते. कैलास मानसरोवर यात्रेसही सरकारची मदत मिळायला हवी. त्यांनी सांगितले, तातडीने यासंदर्भात लेखी पाठव; मी काहीतरी करतो.
त्यानंतर या प्रकरणाची पार्श्‍वभूमी सांगत एक हस्तलिखित निवेदन सरकारकडे दिले. त्यावेळी बिशन टंडन अटलजींचे मुख्य सचिव होते. हे पत्र त्यावेळी लोकसभेमध्ये पाठविले गेले. त्यावेळी अटलजी राजीनामा देणार होते. तेथूनच अटलजींनी यावर स्वाक्षरी करत या यात्रेस निधी मंजूर केला आणि ही परंपरा आजपर्यंत सुरू आहे. त्यानंतर अनेक राज्यांनीही यात्रेसाठी निधी देण्याची सुरुवात केली.
दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर अटलजींनी अधिक आत्मविश्‍वासासह काही कठोर निर्णय घेतले. पोखरण-2 मधील स्फोट हा असेच आश्‍चर्यचकित करणारा क्षण होता. अमेरिकेसारखा तथाकथित सर्वशक्तिमान देशही यामुळे बावचळला आणि हैराण झाला होता. अमेरिकेकडून आपल्याला सुपर कॉम्प्युटर मिळाला नाही, तर ज्येष्ठ शास्त्रज्ञ विजय भटकर यांना प्रोत्साहन देत भारतामध्येच सुपर कॉम्प्युटर तयार केला. क्रायोजेनिक इंजिन मिळाले नाही, तर आपणच देशात ते तयार केले. कारगिलमध्ये पाकिस्तानला पराभवाचा दणका दिल्यानंतर झालेली आग्रा शिखर परिषद याच आत्मविश्‍वासाची द्योतक होती.
दळवळण क्षेत्रामधील क्रांती, मोबाइल फोन स्वस्त करून घराघरांत पोचविणे, भारताचे चार कोपरे सुवर्ण चतुष्कोन राजमार्गाने जोडणे आणि शस्त्रास्त्रनिर्मितीमध्ये भारताला अधिक सक्षम बनविणे हे अटलजींच्या विकासकेंद्रित राजकारणाची उदाहरणे आहेत. समाजातील सर्वांत शेवटच्या थरावरील व्यक्तीची गरिबी दूर करण्यासाठी ते चिंतीत असत. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्म मानवतावाद आणि गांधी चिंतन यावर त्यांची श्रद्धा होती. याचमुळे भाजपच्या निर्मितीनंतर त्यांनी गांधीवादी समाजवाद स्वीकारला.
गगन में लहराता है भगवा हमारा, 
रग-रग हिंदू मेरा परिचय 
और केशव के आजीवन तप की 
यह पवित्रतम धारा.. साठ सहस ही तरेगा 
इससे भारत सारा। 
अशी कविता अटलजींनी रचली. “हिरोशिमा की वेदना’ आणि “मनाली मत जईयो’ हे काव्य संग्रह त्यांच्या कविमनाच्या वेदना दर्शवितात. एकवेळ त्यांना स्वकीयांकडूनच टीका स्वीकारावी लागली. यातून ते दु:खी झाले, पण तुटले नाहीत.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)