शौचालय अनुदान घोटाळ्याची सीआयडीमार्फत चौकशी व्हावी

मनसेच्या वतीने अकलूज विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

अकलूज – माळशिरस तालुका पंचायत समितीमधील शौचालयाच्या घोटाळ्याची सीआयडीमार्फत चौकशी करण्याबाबतचे निवेदन मनसेच्या वतीने अकलूज उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष किरण साठे, माळशिरस तालुकाध्यक्ष बापू वाघमारे, महिला सेना अध्यक्ष रुक्‍मिणी रणदिवे,अकलूज शहर अध्यक्ष सुदाम आवारे, सरचिटणीस सोमनाथ शेळके, माळेवाडी शहर अध्यक्ष चंद्रकांत शेळके, मनविसे अकलूज शहर अध्यक्ष रवी कांबळे, इस्लामपूर विभाग अध्यक्ष संतोष शिंदे, बंडू कांबळे, विकी केसकर, महिला सेनेच्या माळशिरस विभाग अध्यक्ष शारदा शेगर, शहर अध्यक्ष राणी राजपूत उपस्थित होते.

या शौचालय घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये कनिष्ठ सहायक ढवणे,सभापती वैष्णवी मोहिते पाटील, उपसभापती किशोर सूळ, गटविकास अधिकारी यांची सीआयडीमार्फत चौकशी करावी अन्यथा मनसेच्या वतीने अकलूज येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर 19 एप्रिल 2018 रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आल्याचे मनसे जिल्हा उपाध्यक्ष किरण साठे यांनी दिला आहे.

या निवेदनामध्ये पंचायत समितीमधील स्वछ भारत अभियानांतर्गत शौचालय अनुदान हे प्रत्येक लाभार्थीच्या खात्यावर 12 हजार रुपयांप्रमाणे जमा करणे बंधनकारक असताना ते अनुदान खात्यावर जमा होत नसल्याच्या तक्रारी लाभधारकांनी गटविकास अधिकारी आणि पंचायत समितीच्या इतर सदस्यांकडे केल्या होत्या. त्यानंतर चौकशी झाल्यावर पंचायत समितीचे कनिष्ठ सहाय्यक ढवणे यांनी ती अनुदानाची रक्कम गटविकास अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून स्वतःच्या खात्यावर टाकलेली आढळू आले. त्यामध्ये ढवणे यांनी 41 लाख 64 हजार रुपयाचा घोटाळा केल्याचे उघड झाले असून, हा घोटाळा सध्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कालावधीमध्ये उघड झाल्याने आपण तालुक्‍यातील जनतेला न्याय देऊ शकत नाही, त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करू शकत नाही, याची नैतिक जबाबदारी स्वीकारून सभापती आणि उपसभापती यांनी राजीनामा द्यावा आणि या घोटाळ्यामुळे ज्या लाभार्थींचे अनुदान मिळाले नाही त्यांना अनुदान देण्याची तजवीज माळशिरस पंचायत समितीने करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)