शोमा सेन यांचा जामीन फेटाळला

पुणे- बंदी घातलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या कारणावरून पोलिसांनी अटक केलेल्या नागपूर विद्यापीठातील प्राध्यापिका शोमा सेन यांचा जामीन अर्ज शुक्रवारी न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांनी हा आदेश दिला.

पोलिसांनी जप्त केलेल्या कागदपत्रांत आरोपींनी बंदी घालण्यात आलेली संघटना सीपीआय माओवादी यांच्या नेत्यांशी पत्रव्यवहार केल्याचा आणि विविध कारवाईत त्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. देश विरोधी कारवाईत त्यांचा सहभाग तपासात दिसून आला आहे. प्रथमदर्शनी आरोपीचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निर्दशनात येते. सध्या तपास महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. त्यामुळे आरोपींचा जामीन अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे आदेशात नमूद केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

न्यायालयाने गेल्या आठवड्यात नजरकैदेत असलेल्या वरनॉन गोन्साल्वीस, ऍड. सुधा भारद्वाज आणि अरुण फरेरा यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे गोन्साल्वीस, फरेरा आणि ऍड. भारद्वाज यांना अटक करण्यात आली असून ते 6 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. तर, ऍड. सुरेंद्र गडलिंग यांच्या जामीन अर्जावर आज (दि. 3) निर्णय होणार आहे. या प्रकरणातील आरोपींनी केलेले हे कृत्य समाजाला धक्का पोहचविणारे आहे. एमआय फोर या हत्याराच्या 4 लाख राऊंडसाठी 8 कोटी रुपयांचा वार्षिक पुरवठ्याचा उल्लेख पत्रात आहे. भूमिगत माओवादी कार्यकर्ते प्रकाश यांच्या 25 सप्टेंबरच्या पत्रात कांदुलनार, बसगुडा परिसरातील सुरक्षा व्यवस्था आणि रस्ता खुले करण्यासाठी वायर, खिळे, नायट्राइट पावडर यांचे नियोजन करणे, यावरुन माओवाद्यांचा प्लॅन लक्षात येतो. आरोपींनी देशाच्या एकता, एकात्मता, सुरक्षा, सार्वभौमत्वाला धक्का पोहचविण्याचे कृत्य केले, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)