शोपियनमध्ये सुरक्षा रक्षकांच्या गोळीबारात 2 ठार

श्रीनगर – जम्मू काश्‍मीरमधील शोपियन भागामध्ये हिंसक आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये दोघेजण ठार झाले, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. गनोवपोरा गावाजवळून जात असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या वाहनांच्या ताफ्यावर आंदोलकांनी दगडफेक करायला सुरूवात केली होती.

त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी आंदोलकांना पळवून लावण्यासाठी बंदुकीतून काही फैरी झाडल्या. त्यामध्ये काही जण जखमी झाले होते. या जखमींपैकी दोघेजण मरण पावले. आणखी एकाला श्रीनगरमधील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे. या दोघांच्या मृत्यूमुळे गानोवपोरा आणि जवळपासच्या परिसरातील परिस्थितीमध्ये तणाव पसरला आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)